जळगाव, (जिमाका) दि. 7 - आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुळहुळे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, तहसिलदार (संगांयो) जितेंद्र कुंवर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000


No comments:
Post a Comment