जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत व विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणाऱ्या व्हीटीपी-व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, व्हीटीआय-व्होकेशनल ट्रेनिंग इन्टि ट्यूट आणि नोंदणीच्या प्रतीक्षेत, इच्छुक असणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थां स्कील इंडिया पोर्टलवर (TP-Training Provider & TC – Training Centre) नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीच्या संपूर्ण
प्रोसेसमध्ये आपले (TP- TC) हे Fully Accrediated – मान्यता & Fully
Affiliated – संलग्नता होईल याची दक्षता घ्यावी. संस्थेची / सेंटरची स्कील इंडिया
पोर्टलवर Fully Accrediated - मान्यता
& Fully Accrediated संलग्नता प्राप्त झाल्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उमेदवारांना देणे शक्य
होईल. स्कील इंडिया पोर्टलवरील नोंदणी व
इतर अनुषंगिक माहितीसाठी पुढील लिंकचा उपयोग करावा. Link :-
https://skillindia.gov.in कौशल्य
विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त
प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या संस्था/सेंटर यांनी स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी
करावी, असे आवाहन वि.जा. मुकणे, सहाय्यक
आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी
केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2959790 या दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment