जळगाव दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी जिल्हयात 12 वा राष्ट्रीय दिवस जिल्हा व मतदान केंद्र स्तरावा कोवीड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व मतदारांना “ सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणूका” हा विषय (Theme) भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.
यावर्षीचा
जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस मुख्य प्रशासकीय इमारत, सिनेट सभागृह, कवियित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. 25 जानेवारी, 2022 रोजी
सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. कुलगुरु, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, पोलीस अधिक्षक,
जळगाव तसेच आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाचे
थेट प्रक्षेपण फेसबुक https;//www.facebook.com/jalgaonDm या लिंकव्दारे करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा
जिल्हयातील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम
हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment