जळगाव,
दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी
विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,
उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार पंकज लोखंडे, सुरेश थोरात, जितेंद्र
कुवर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment