जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 2022 अंतर्गत सहाय्यक जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा व जनजागृती शिबीर दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी संपन्न झाले आहे. शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या
प्रास्ताविकतेत योगेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी ज्येष्ठ
नागरिकां साठी समाज कल्याण विभागाचा भुमिका याबाबत माहिती दिली. तसेच ज्येष्ठ
नागरिक जिल्हास्तरीय समितीचे सदस्य दत्तात्रय चौधरी, पंडीतराव सोनार यांनी देखील
मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास व्याख्याते प्रा. अशोक पवार, प्रशिक्षक यशदा यानी
ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 विश्लेषण केले तर ॲड प्रविण जंगले यांनी मृत्युपत्र
बाबतचा कायदयाची संपुर्ण माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे
आभार समाज कल्याण निरीक्षक श्रीमती शोभा चौधरी यांनी मानले , तर तालुका समन्वयेक किशोर माळी
यांनी सुत्रसंचलन केले.
मेळाव्यास जळगाव शहर व जिल्हयातील ज्येष्ठ
नागरिक संघाचे पदाधिकारी व समाजसेवक मोठया
संख्येने उपस्थिती होते. मेळावा
यशस्वीतेसाठी कार्यालय अधिक्षक अरुण वाणी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आर. डी.
पवार, महेद्र चौधरी, समीर क्षत्रिय, बार्टी तालुका समन्वयक महेद्र पाटील, अनिल
पगारे, चेतन चौधरी, शिला अडकमोल, जितेद्र धनगर यांनी परिश्रम घेतले.
००००
No comments:
Post a Comment