Tuesday, 17 May 2022

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा (D-1) फार्म ऑनलाईन भरावेत

                                                                                    जळगाव,दि.17 (जिमाका वृत्तसेवा) :अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्न व्य्वसाय करणाऱ्या उत्पादक आस्थापनांना अन्न व औषध प्रशासन,     म. राज्य, जळगाव कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की, सन 2021-2022 या महसुल वर्षापसुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपला परतावा अर्ज करतेवेळीचा युझर आय डी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssai.gov.in  या सकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. त्यामुळे या वर्षापासून ग्राहकांना डी-1 फॉर्म भरण्यासाठी कार्यालयात Email करणे वा कार्यालयात समक्ष येण्याची आवश्यकता नाही. तसेच अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर युझरआयडी वा पासवर्ड माहित नसल्यास   https://foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर जावुन  forget password or login id  टाकुन नविन  login id व  password generate  करावा व त्यानंतर अन्न व्यावसायिकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी- १ सादर करावा. तसेच वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा helfdesk-foscos@fssai.gov.in  या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

          तसेच डी -1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 जून, 2022 असुन सदर तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिन 100 रुपये या प्रमाणे दंड शुल्क भरावे लागेल याची सर्व उत्पादक आस्थापनांनी नोंद घ्यावी  असे आवाहन सहाय्यक आयुक्‍ एस के. कांबळ अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment