जळगाव, दि.५ (जिमाका वृत्तसेवा) : - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत मे महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
मे-2022 चे शिबीर
कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण
अमळनेर-पहिला व चौथा सोमवार, जामनेर-दुसरा
बुधवार, पाचोरा-चौथा बुधवार, भुसावळ-पहिला, दुसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव-पहिला,
दुसरा, तिसरा व चौथा शुक्रवार, यावल - पाचवा मंगळवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा
- दुसरा सोमवार, रावेर – दुसरा मंगळवार, बोदवड - तिसरा मंगळवार, पारोळा - पाचवा
सोमवार, एरंडोल – चौथा मंगळवार,
मुक्ताईनगर- तिसरा बुधवार, वरणगाव – तिसरा गुरुवार याप्रमाणे दौरा राहील.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास
आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment