जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अमळनेर येथे सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 15 जुलै,2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका / आणि पदवी नंतरचे पव्युत्तर विद्यार्थ्यांनी दिनांक 24 ऑगस्टख् 2022 पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 सप्टेबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्वीय मुलींचे शासकीय वसतिगृह अमळेर यांनी केले आहे.
अमळनेर
शहरातील शैक्ष्णिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय
विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील
इतर शैक्षणिक व्यवसायीक अभ्यासक्रमाती प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठभ्
विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल.
त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला / मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 8 वी
पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाकरिता प्रक्रिया सुरु झाली आहे.
प्रवेशित
विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तेसेच
निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्यांना
ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका
पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी
आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत,
अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन, गृहपाल डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अमळनेर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment