जळगाव, दि.११ (जिमाका वृत्तसेवा) :- शासनातील निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृह येथे २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधान
महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी), महाराष्ट्र-१, मुंबईचे अधिकारी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृह येथे निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि
मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहतील. प्रधान महालेखाकार (लेखा व
हकदारी), महाराष्ट्र-१, (मुंबई) कार्यालयाने पेंशनरांच्या सोईकरिता अनेक उपक्रम
राबविले आहेत, जसे साप्ताहिक ऑनलाईन पेंशन संवाद, २४ तास उपलब्ध टोल फ्री
नं.१८००-२२-००१४ / २४*७ व्हॉईस मेल नं.०२०-७११७७७७५, माहिती वाहिनी, पेंशन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र पेंशनर्स करीता
समर्पित ई-मेल
‘helpdesk.mh1ae@cag.gov.in या
उपक्रमांची माहिती देण्यात येईल.
सर्व
निवृत्तीधारकांनी या अदालत मध्ये सहभागी होऊन या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन
जिल्हा कोषागार अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले
आहे.
No comments:
Post a Comment