Wednesday, 30 November 2022

गावठाणापासून 200 मीटरच्या आतील जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता नाही

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 30    जिल्हाधिकारी  जळगाव यांच्यावतीने आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शसनाच्या  दिनांक 5 जानेवारी, 2017 रोजीच्या अध्यादेशानुसार जमिनीचे वापरातील बदलाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 42 मध्ये सुधारणा केली असून नव्याने कलम 42 (ब), 42 (क) व शासनाच्या दिनांक 17 जानेवारी 2018 रोजीच्या राजपत्रानुसार 42 (ड) कलमांचा समावेश केला आहे. त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारुप विकास योजनेमध्ये आणि प्रादेशिक योजना व प्रारुप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिध्द केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी तसेच गावठाणापासून 200 मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही.

           या सुधारणेनुसार विविध विभागांचे नाहरकत दाखले, त्यामध्ये होणारा कालापव्यय कमी होवून जमीन मालकांना सनद दिली जाणार आहे. या सुधारणांनुसार जमिनीची अकृषक वापरात बदल करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली असून त्यांचा खातेदारांनी फायदा घेतला आहे. या सुसूत्रीकरणामुळे जमिनी त्वरीत अकृषक झाल्यामुळे त्यावर विकास करण्यास चालना मिळालेली आहे.

          जिल्हयातील साधारणत: 1348 खातेदारांनी या सुधारणेचा फायदा घेतलेला आहे. तरी जिल्ह्यातील भुधारकांना आवाहन करण्यात येते की, आपण धारण करीत असलेल्या जमिनी वर नमूद सुधारणांनुसार अकृषीक करण्यासाठी पात्र असल्यास आपण अशा पात्र जमिनींचे अकृषक रुपांतरण करण्यास इच्छुक असल्यास सदर सुधारणांचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी आपले कार्यक्षेत्रातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

शेतकऱ्यांनी अप्रमाणित किटकनाशक खरेदी करु नये

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 30   चाळीसगाव – किटकनाशकाची गुणवत्ता तपासणीसाठी मे.एच.पी.एम केमिकल्स अँड फर्टिलायझर  लिमिटेड, दिल्ली  या किटकनाशक कंपनी उत्पादित किटकनाशक कार्बेन्डॅझिम 12 % + मन्कॉझेब 63 %  डब्लु.पी. ट्रेड नाव – स्टफ, बॅच नंबर S- 333,  पॅकींग 250 ग्रॅम या किटकनाशकाचा नमुना शासकीय किटकनाशक तपासणी प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आला होता. सदर किटकनाशकाचा नमुना किटकनाशक तपासणी प्रयोगशाळेत तपासणीतअंती अप्रमाणित आढळून आला आहे. त्यामुळे या किटकनाशकाच्या शिल्लक साठयास विक्री बंदची कारवाई करण्यात आलेली आहे. तरी सुध्दा या बॅचचे या किटकनाशकाची शेतकरी बांधवांनी खरेदी करु नये, असे आवाहन कृषि अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

Monday, 28 November 2022

समाज कल्याण विभागाच्या 'समता पर्वास' प्रारंभ, 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन

       जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- संविधान दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन जळगाव 26 नोव्हेंबर राज्यात सामाजिक न्याय संविधान दिन 26 नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर,2022 या कालावधीत समता पर्व साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता पर्वास आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगाव येथे प्रमुख व्याख्याते प्रा. शाम सोनवणे श्री. रविंद तायडे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब संघटना जळगाव बी.के तायडे, जिल्हा सचिव कास्ट्राईब संघटना जळगाव योगेश पाटील सहायक आयुक्त श्रीमती मनिषा पाटील सहा – लेखाधिकारी तसेच कार्यालयीन सर्व कर्मचारी तालुका समन्वयक समतादूत परिया उपस्थितीत संविधान प्रस्ताविकेच वाचन करण्यात आला.

          तसेच 26 नोव्हेंबर संविधान दिना पासून समता पर्व' उपक्रमास प्रभातफेरी  संविधान वाचना व विविध उपक्रमाने सुरुवात करण्यात आली. शासकिय वसतिगृहातील मुला-मुलींने यांच्यावतीन  सकाळी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन जळगाव ते मॉल खान्देश मिल आवार जळगाव विधान  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संखेने विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता.  समाजिक न्याय भवनात सविधान प्रस्ताविका वाचनाने रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी श्रीमती जयश्री महाजन महापौर महानगरपालिका  जळगाव प्रभारी जिल्हाधिकारी जळगाव प्रविण महाजन, माजी महापौर श्रीमती सिमताई भोळे,  केंद्रीय संचालक ब्‍युरोचे व्यवस्थापक मा.श्री राजेश देशमुख क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रबुद्ध पवार  व सहायक आयुक्त योगेश पाटील, श्रीमती मनिषा पाटील महाखाधिकारी,  श्री. राजेंद्र काबळे कार्यालय अधिक्षक तसेच  सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह वसतिगृहाचे गृहपाल, तसंच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          सदर समता पर्व अंतर्गत दि. 27 नोव्हेंबर रोजी प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा व महाविदयालये, सर्व  शासकीय वसतिगृहे,  निवासी शाळा, समाजकार्य  महाविदयालये,  दिव्यांग शाळा, अनुदानित  वसतिगृहे, शाहू – फुले - आबेडकर निवासी - अनिवासी आश्रमशाळा केंद्रीय आश्रमशाळांमध्ये निबंध  स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परीक्षा वकृत्व स्पर्धा व  इतर कार्यक्रम होणार आहे. 28 रोजी संविधाना वर व्याख्यानाच आयोजन करण्यात आले आहे. 29  नोव्हेंबर रोजी  संविधान या विषयावर  न्याय भवनात पत्रकारांची कार्यशाळा विषय - सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा 30 नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर भितीपत्रक, पोस्ट्रस बॅनर इत्यादी बाबत जिल्हा विभाग राज्य स्तरावर चित्रकला स्पधेचे आयोजन 1 डिसेंबर रोजी युवा गटाची कार्यशाळा, 2 डिसेंबर रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीना भेटी, 3 डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, 4 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय  यांच्यासाठी कार्यशाळा, 5 डिसेबर रोजी  संविधान विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समता पर्वाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण  दिन 6 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरणाने होणार आहे असे सहाय्यक आयुक्त  पलिस वितरणानं येणार आहे. समाजकल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

आपली एकता आपली समानता एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता जागतिक एडस दिन -2022

       जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- तुम्हाला माहित आहे का ? एआरटी  औषधोपचार आहे सर्वासाठी मोफत,  आजच  जवळच्या सरकारी रुग्णालयातील एआरटी केंद्राला भेट दया, मोफत एआरटी औषधोपचार आहे मोफत आजच जवळच्या सरकारी रुग्णालयातील एआरटी केंद्राला भेट दया, मोफत एचआयव्ही तपासणी मोफत एआरटी / औषधोपचार त्वरीत जवळच्या सरकारी रुग्णालयातील मोफत सेवांचा लाभ घ्या , एआरटी / आयसीटीसी केंद्राला भेट दया, उशिरा एचआयव्ही तपासणी उशिरा औषधोपचार उशिरा आजारमुक्ती त्याकरिता आजच जवळच्या सरकारी रुग्णालयातील एआरटी / आयसीटीसी केंद्राला भेट दया व मोफत सेवांचा लाभ घ्या, आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्ही तुमची एचआयव्हीची तपासणीकरिता आजच जवळच्या सरकारी रुग्णालयातील आयसीटीसीशी भेट दया, तुम्ही गरोदर आहात का, तुमच्या व तुमच्या बाळाच्या संरक्षणाकरिता तुम्ही तुमची आयसीटीसीमध्ये मोफत तपासणी करुन घ्या व निश्चित रहा,

          आयसीटीसीमध्ये एचआयव्हीची मोफत तपासणी करा व चिंतामुक्त व्हा, एचआयव्हीचे ज्ञान करा जीवन सज्ञान अधिक माहितीकरीता राष्ट्रीय एडस हेल्पलाईन  क्रमांक 1097 वी मोफत संपर्क करा,

तुम्हाला तुमचे फेसबुक, व्हॉटसॲप स्टेटस माहिती आहे ना ? मग एचआयव्हीचे का नाही आजच जवळच्या सरकारी रुग्णालयातील आयसीटीसी केंद्रामध्ये एचआयव्हीची मोफत तपासणी करुन घ्या.

          Share करा Like  करा एचआयव्ही विषयीची माहिती Share करा  एचआयव्ही चार कारणांनी जरी होत असला, तरी त्याचे मुख्य कारण प्रतिबंधाकडे दुर्लक्ष हे आहे. आजच जवळच्या सरकारी रुग्णालयातील आयसीटीसीशी संपर्क करा,

एचआयव्ही / एडसविषयी अधिक माहितीकरिता राष्ट्रीय एडस हेल्पलाईन टोल फ्री नं. 1097      ( सर्व भाषांमध्ये उपलब्ध ) वर मोफत संपर्क करा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा सचिव जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समिती जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

º´É.¦ÉÉ>ðºÉɽäþ¤É ¡ÖÆòb÷Eò®ú ¡ò³ý¤ÉÉMÉ ±ÉÉMÉ´Éb÷ ªÉÉäVÉxÉÉ ºÉxÉ 2022-23

 जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- VɳýMÉÉ´É ÊVɱ½þªÉÉiÉÒ±É ºÉ´ÉÇ ¶ÉäiÉEò®úÒ ¤ÉÉÆvÉ´ÉÉÆxÉÉ Eò³ýÊ´ÉhªÉÉiÉ ªÉäiÉä EòÒ, º´É.¦ÉÉ>ðºÉɽäþ¤É ¡ÖÆòb÷Eò®ú ¡ò³ý¤ÉÉMÉ ±ÉÉMÉ´Éb÷ ªÉÉäVÉxÉÉ ºÉxÉ 2022-23 +ÆiÉMÉÇiÉ VɳýMÉÉ´É ÊVɱ½þªÉÉºÉ +ÉÌlÉEò ±ÉIÉÉÆEò |ÉÉ{iÉ ZÉɱÉä +ɽäþ. ºÉnù®ú ªÉÉäVÉxÉäiÉÆMÉÇiÉú 16 ¤É½Öþ´ÉÉ̹ÉEò ¡ò³ýÊ{ÉEòÉÆSÉÉ ºÉ¨ÉÉ´Éä¶É Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä±ÉÉ +ºÉÚxÉ ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÉ iªÉÉÆSªÉÉ +ɴɶªÉEòiÉäxÉÚºÉÉ®ú JÉɱÉÒ xɨÉÖnù Eäò±É䱪ÉÉ ¡ò³ýÊ{ÉEòÉÆSªÉÉ Eò±É¨Éä/®úÉä{ÉÉÆSÉÒ +xÉÖnùÉxÉÒiÉ iÉk´ÉÉ´É®ú ±ÉÉMÉ´Éb÷ Eò®úhªÉɺÉÉ`öÒ +ÉìxÉ ±ÉÉ<ÇxÉ {ÉvnùiÉÒxÉä +VÉÇ ¨ÉÉMÉÊ´ÉhªÉÉiÉ ªÉäiÉ +ɽäþiÉ. ºÉnù®ú ¤É½Öþ´ÉÉ̹ÉEò ¡ò³ýÊ{ÉEäò {ÉÖføÒ±É |ɨÉÉhÉä +ɽäþiÉ.

 

      ¡ò³ýÊ{ÉEòÉSÉä xÉÉ´É 1) +ÉÆ¤ÉÉ Eò±É¨Éä/®úÉä{Éä - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 10 x 10 - ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ 100 - +ÉÆ¤ÉÉ Eò±É¨Éä/®úÉä{Éä (ºÉPÉxÉ ±ÉÉMÉ´Éb÷) - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 5 x 5 ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  4002) EòÉVÉÖ Eò±É¨Éä/®úÉä{Éä +ÆiÉ®ú (¨ÉÒ) -  7 x 7 ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  200 3) {Éä¯û Eò±É¨Éä (ºÉPÉxÉ ±ÉÉMÉ´Éb÷) - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 3 x 2 ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  1666 {Éä¯û Eò±É¨Éä - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 6 x 6 ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  277

4) b÷É˳ý¤É Eò±É¨Éä  - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 4.5 x 3 -  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -   740

5)EòÉMÉnùÒ Ë±É¤ÉÖ Eò±É¨Éä/®úÉä{Éä - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 6 x 6-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -   277

6) ¨ÉÉäºÉƤÉÒ Eò±É¨Éä - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 6 x 6-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -   277

7) ºÉÆjÉÉ Eò±É¨Éä- +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 6 x 6-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -   277

8) ºÉÆjÉÉ Eò±É¨Éä (<Æb÷Éä-<ºjÉÉ<Ç±É iÉÆjÉYÉÉxÉ) -+ÆiÉ®ú (¨ÉÒ) -  6 x 3-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -   277  9) xÉÉ®ú³ý ®úÉä{Éä ¤ÉÉhÉɴɱÉÒ- +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 8 x8-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  150

10) xÉÉ®ú³ý ®úÉä{Éä टी/डी +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 8 x8-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  150

11) सिताफळ कलमे / रोपे  - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 5x5-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  400

12) आवळा कलमे / रोपे - +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 7 x7-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  200

13) ËSÉSÉ Eò±É¨Éä / ®úÉä{Éä- +ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 10 x10-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  100

14) VÉÉÆ¦ÉÚ³ý Eò±É¨Éä/ ®úÉä{É -+ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 10 x10-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  100

15) EòÉäEò¨É Eò±É¨Éä/®úÉä{Éä-+ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 7 x7-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  200

16) ¡òhÉºÉ Eò±É¨Éä/®úÉä{É -+ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 10 x10-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  100

17) +ÆÊVÉ®ú Eò±É¨Éä-+ÆiÉ®ú (¨ÉÒ) -  4.5 x 3-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  740

18) ÊSÉEÚò Eò±É¨Éä -+ÆiÉ®ú (¨ÉÒ) - 10x 10-  ½äþC]õ®úÒ ZÉÉbä÷ ºÉÆJªÉÉ -  100

 

          ¶ÉäiÉEò®úÒ ¤ÉÉÆvÉ´ÉÉxÉÒ ={É®úÉäCiÉ ¡ò³ýÊ{ÉEòÉÆSÉä Eò±É¨Éä/®úÉä{Éä ±ÉÉMÉ´Éb÷ÒºÉÉ`öÒ ±ÉÉ¦É PÉähªÉÉEò®úÒiÉÉ https://mahadbtmahait.gov.in ªÉÉ ºÉÆEäòiɺlɳýÉ´É®ú ¶ÉäiÉEò®úÒ ªÉÉäVÉxÉÉ +ÆiÉMÉÇiÉ ½þÉ {ɪÉÉÇªÉ ÊxÉ´ÉbÚ÷xÉ +VÉÇ ºÉÉnù®ú Eò®úÉ´ÉÉ. ºÉnù®ú ªÉÉäVÉxÉäSÉÉ ±ÉÉ¦É PÉähªÉɺÉÉ`öÒ ¶ÉäiÉEò®úÒ ¤ÉÆvÉÖxÉÒ +É{ɱªÉÉ ´ÉèªÉCiÉÒEò ¨ÉÉä¤ÉÉ<Ç±É Gò¨ÉÉÆEò +É{ɱªÉÉ +ÉvÉÉ®ú EòÉbÇ÷¶ÉÒ ºÉƱÉMxÉ Eò®úhÉä +ɴɶªÉEò ®úɽþÒ±É. ¨ÉɽþÉb÷Ò¤ÉÒ]õÒ {ÉÉä]Çõ±É´É®ú  |ÉÉ{iÉ +VÉÉÈSÉÒ +ìÉxɱÉÉ<ÇxÉ {ÉvnùiÉÒxÉä ±ÉÉì]õ®úÒ EòÉføhÉä, {ÉÚ´ÉÇºÉÆ¨ÉiÉÒ näùhÉä, ¨ÉÉäEòÉ iÉ{ÉɺÉhÉÒ iɺÉäSÉ ÊxÉ´Éb÷ ZÉɱÉ䱪ÉÉ ±ÉɦÉÉlªÉÉÈSªÉÉ JÉÉiªÉÉ´É®ú lÉä]õ +xÉÖnùÉxÉ Ê´ÉiÉ®úhÉ Eò®úhÉä, <iªÉÉnùÒ |ÉÊGòªÉÉ +ÉìxɱÉÉ<ÇxÉ ½þÉähÉÉ®ú +ºÉ±ªÉÉxÉä ={É®úÉäCiÉ ªÉÉäVÉxÉäSÉÉ ±ÉÉ¦É PÉähªÉÉºÉ <SUÖôEò ¶ÉäiÉEò®úÒ ªÉÉÆxÉÉ ¨É½þÉb÷Ò¤ÉÒ]õÒ ªÉÉ {ÉÉä]Çõ±É´É®ú ÊnùxÉÉÆEò 30 नोव्हेंबर 2022 {ɪÉÈiÉ i´É®úÒiÉ +VÉÇ ºÉÉnù®ú Eò®úhªÉÉSÉä +É´ÉɽþxÉ ÊVɱ½þÉ +ÊvÉIÉEò EÞòÊ¹É +ÊvÉEòÉ®úÒ संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. VɳýMÉÉ´É ªÉÉÆSÉäEòbÚ÷xÉ Eò®úhªÉÉiÉ ªÉäiÉ +ɽäþ.

००००००

4 डिसेंबर, रोजी मागासवर्गीय विदयार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र बाबत शिबीर आयोजित

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक 6 डिसेंबर, हा दिवस भारतीयांसाठी दुखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या विषर्यी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व आयोजित केले आहे.

          त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव मार्फत दिनांक 04 डिसेंबर, 2022 रोजी मागासवर्गीय विदयार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र बाबत शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 6 डिसेंबर, 2022 रोजी महापरिनिर्वाण दिनी  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव कडुन जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. असे  सदस्य सचिव जिल्हा जात पडताळणी समिती यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

संविधान दिनाच्या दिवशी मागासवर्गीय विदयार्थ्यांना ऑनलाईन जात प्रमाणपत्र वाटप

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक 6 डिसेंबर, हा दिवस भारतीयांसाठी दुखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या विषर्यी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व आयोजित केले आहे.

          त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव मार्फत दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 रोजी संविधान दिनाच्या औचित्य साधून मागासवर्गीय विदयार्थ्यांचे 450 प्रकरणे वैध करुन मागासवर्गीय विदयार्थ्यांना ऑनलाईन निर्गमित ( वाटप) करण्यात आलेली आहेत. असे सदस्य सचिव जिल्हा जात पडताळणी समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                               ०००००

रावेर येथील आठवडे बाजार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी हे तीन दिवस सोडून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- रावेर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्ताने आठवडे बाजार परिसरात रथ उत्सव व मिरवणूक आणि आतिषबाजीचा कार्यक्रम असतो रावेर तालुक्यातुन  व आसपासच्या ग्रामीण भागातुन मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी असते.

          रावेर येथील रथ उत्सव व मिरवणुक आणि आतिषबाजीचा पारंपारिक नियोजीत कार्यक्रम सोहळा हा आठवडे बाजार परिसर, रावेर येथे होणार आहे. सदर कार्यक्रम गुरुवार, शुक्रवार, शनिवार दिनांक 8,9,10 डिसेंबर या तीन दिवस  चालणार आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेता सदर कार्यक्रम  सोहळयाचे ठिकाण आणि दर शुक्रवारी रावेर येथील आठवडे बाजाराचे ठिकाण हे एकच आहे. तसेच सदर कार्यक्रम हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवस सलग असल्याने नियमित बाजाराचा दिवस वगळून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा असे जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल जळगाव , यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

 

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी. याकरीता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केलेली आहे.

          या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते- मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते.

महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास आवश्यक बाबी

          अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा, अर्जदार या जिल्हयाचा रहिवासी असावा, अर्जदाराचे सबिली क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही योजनेचा लाभ  घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न           रु. 3,00,000/-  पेक्षा जास्त नसावे,  एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा,

अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे, अर्जदारास महामंडळाचे प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे करारपत्रे/ कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर योजनेत साधारणपणे पुरुष व महीला 50% आरक्षण, ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील, तसेच राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कृत व्यक्तीना प्राधान्य राहील. सैन्यदलातील वीरगती वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल. अर्जदाराने कर्जमंजुर कर्ज वितरणापुर्वी त्याच्या वारसदाराचे बंधपत्र दयावे लागेल, अर्जदाराकडुन कर्जमजुरी नंतर कर्ज वितरणा पुर्वी 02 जामिनदार (01 नोकरदार, त्याच्या कार्यालयाकडील विभाग कार्यालय प्रमुखाचे वसुलीसाठी हमीपत्र  घेण्यात येईल, 01 मालमत्ता धारक जामीनदाराच्या मालमत्तेवर महामंडळाच्या कर्जाचा बोजा नोंद करुन देणे आवश्यक आहे. अर्जदारास कर्ज मंजुर वितरणांपुर्वी कर्ज वसुली पोटीउत्पन्न दिनांकीत धनादेश देणे बंधनकारक, अर्जदाराने मंजुर कर्जाचा पहिला हप्ता वितरीत केल्यानंतर व्यावसायाचा विमा महामंडळ व लाभार्थी यांचे संयुक्त नावे करणे बंधनकारक राहील व दर वर्षी विम्याचे नुतनीकरण करणेसाठी होणारा खर्च लाभार्थीने स्वत: करावा, कर्ज वितरण झाल्यापासून तीन महीन्यानंतर कर्जाची वसुली ( मुद्दल व व्याज) या प्रमाणे करावी / महामंडळात कर्ज वसुली दरमाह भरावी, सदर कर्ज योजनेचे फॉर्म कार्यालयात विनामुन्य आहेत सदर थेट कर्ज योजनेचे , अर्ज स्विकारण्याची मुदत  दिनांक – 28 नोव्हेंबर, 2022 ते  20 डिसेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सांय 6.15 पर्यंत स्विकारले जातील, प्राप्त  कर्जप्रकरणांची छाननी / तपासनी शासन निर्णयानुसार करण्यात येऊन लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये संबधित अर्ज ठेवण्यात येतील. लाभार्थी समितीमध्ये मंजुर झालेल्या पात्र लाभार्थीचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीस पाठविण्यात येतील. त्याच प्रमाणे जिल्हा कार्यालयास दिलेल्या उद्दिष्टां पेक्षा जास्ती कर्जप्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थीची निवड लॉटरी पध्दतीने शासन निर्गमीत आदेशानुसार लाभार्थी निवड समिती मार्फत करण्यात येईल.

          तरी संबधीत होतकरु समाजातील महीला / पुरुष वर्गानी/ प्रशिक्षीत लाभार्थीनीं सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे  जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहरी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातनुर कॉलनी,  ताराचंद कसबे यांना एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Friday, 25 November 2022

मंडणगड पॅटर्न, अंतर्गत जळगाव जिल्हयातील महाविदयालयांना भेटी

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : -मंडणगड पॅटर्न अंतर्गत जळगाव जिल्हयातील महाविदयालयांना भेटी देवून विदयार्थी तसेच महाविदयालयांचे प्राचार्य / कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्याकरीता मा. उपायुक्त, समाज कल्याण व मा. महासंचालक, बार्टी पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 25 नोव्हेंबर, 2022 रोजी जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री. बी.यु.खरे यांनी अमळनेर तालुक्यातील  श्री. एन.टी. मुंदडा कनिष्ठ महाविदयालय अंमळनेर येथे विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेस जळगाव समितीचे नवल चव्हाण, महाविदयालयाचे प्राचार्य तसेच कर्मचारी वृद तसेच 80 विदयार्थी उपस्थित होते.

            तसेच सदर कार्यशाळेच्या अनुषंगाने पारोळा तालुक्यातील श्री. किसान कनिष्ठ महाविदयालय पारोळा येथे जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री. बी. यु.खरे, यांनी विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेस जळगाव समितीचे नवल चव्हाण, महाविदयालयाचे प्राचार्य तसेच कर्मचारी वृंद तसेच 105 विदयार्थी उपस्थित होते. तसेच किसान कनिष्ठ महाविदयालय पारोळा यांचे सन 2022-23 यावर्षात वर्ग 11 वी 309, वर्ग 12 वी 310, या अर्जापैकी 177 विदयार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन प्रस्ताव  समितीकडे प्राप्त झाले आहेत.

            तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव अंतर्गत दिनांक 22 नोव्हेंबर, 2022 तसेच दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 रोजी कार्यालयस्तरावर विदयार्थ्यांच्या अर्जाकरीता त्रुटी पुर्तता मोहिम आयोजित करण्यात आली असून सदर त्रुटी पुर्तते मोहिमेत 39 विदयार्थ्याच्या अर्जांची त्रुटी पुर्तता करण्यात आली आहे. असे सदस्य सचिव  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी.यु. खरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००००

महिला आणि बाल विकास विभाग कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छाळापासून संरक्षण

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : - कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई आणि निवारणत्र अधिनियम – 2013 व नियम दिनांक 9 डिसेंबर, 2013 आणि महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मकचौ – 2013/प्र.क्र.63/मकक- दिनांक 19 जुन, 2014 अन्वये कमाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैगिंक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी कार्यालयीन स्तरावर अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे अनिवार्य आहे.

            समिती गठीत करण्याची पध्दती – ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश असेल त्या सर्व शासकीय निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील सर्व कार्यालय, संस्था, दुकाने, रुग्णालये, सुश्रुषलये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रिडा संकुले इ. सर्व ठिकाणी अधिनियमानुसार अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे अनिवार्य आहे. अंतर्गत तक्रार समिती ही शासननिर्णय आणि अधिनियमाला अनुसरुनच असावी.

            समिती गठीत नसेतल तर दंड भरावा लागेल

            अधिनियमात कलम 26 मध्ये नमुद आहे की जे कार्यालय अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणार नाही त्या कार्यालयाच्या मालकाला रु. 50,000/- ( पन्नास हजार ) पर्यंत दंड आकारण्यात येईल.

            तक्रार कुठे कराल

            शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असेल तर त्यांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार करु शकतात. महिला कर्मचाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            समितीचे फलक लावणे बंधनकारक –

            शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयाच्या दर्शनी भागात अंतर्गत तक्रार निवारण समितीचे फलक लावणे बंधनकारक आहे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

 

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 डिसेंबरला होणार ऑफलाईन

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महीन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

          त्यानुसार 5 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात लोकशाही दिन ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेला आहे. सदर लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सन 2022-23 रब्बी हंगाम मध्ये सहभागी व्हावे

            जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : - केंद्र  शासनाने रब्बी हंगाम 2022-23 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी लि. मुंबई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हयात राबविण्यात येत आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके  घेणारे  ( कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह ) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र  आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

            बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहीत मुदतीपुर्वी नजीकच्या बँक / आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह / कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी न होण्याचा पर्याय उपलब्ध आाहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर  देणे अपेक्षित आहे. योजनेत सहभागी होण्याच्या  मुदतीच्या सात दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना पुढील हंगामा करीता योजनेच्या सहभागातुन वगळण्यात येईल. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

            योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील

1)     गहु बा. - विमा संरक्षित रक्कम रु. 30000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 450/-

2)     ज्वारी बा. विमा संरक्षित रक्कम रु. – 24000/-,   शेतकरी हिस्सा प्रति हे. – 360/-

3)     ज्वारी जि. विमा संरक्षित रक्कम रु. – 24000/-,   शेतकरी हिस्सा प्रति हे. – 360/-

4) हरभरा - विमा संरक्षित रक्कम रु. – 24000/-,   शेतकरी हिस्सा प्रति हे. – 360/-

5) उ. भुईमूग - विमा संरक्षित रक्कम रु. – 35000/-,   शेतकरी हिस्सा प्रति हे. – 525/-

6) र. कांदा - विमा संरक्षित रक्कम रु. – 60,000/-,   शेतकरी हिस्सा प्रति हे. – 3000/-

            प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022 करीता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत पिकनिहाय र. ज्वारी करीता 30 नोव्हेंबर, 2022, गहु, हरभरा, र. कांदा पिका करीता 15 डिसेंबर, 2022, उ. भुईमूग पिका करीता 31 मार्च, 2023 अशी . नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

संपर्कसाठी

1)     आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बॅक,

2)     तालुका कृषि अधिकारी कार्यालय ( सर्व तालुका), जिल्हा जळगाव,

3)     उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव / पाचोरा/अमळनेर, जिल्हा जळगाव,

4)   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव आकाशवाणी शेजारी प्रशासकीय इमारत, जळगाव,

5)    भारती कृषि विमा कंपनी लि. मुबंई टोल फ्री क्र. 1800 419 5004

6)     आपले सरकार सेवा केंद्र, सर्व ( सी.एस.सी.केंद्र), जिल्हा जळगाव.

०००००

Thursday, 24 November 2022

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे वाहन कर / पर्यावरण कर, थकीत असलेल्या वाहनाचा लिलाव

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 24 –  सदर जाहिर नोटीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोदणी तथा कराधान प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे. सदर नोटीसव्दारे वाहनमालकांना / ताबेदारांना / विनदात्यांना जाहिररीत्या कर व दंड भरुन वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे.

            या कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्हयाखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकऱ्यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही. त्यासाठी हि जाहीर नोटीस जारी करण्यात येत आहे.

            वाहनांच्या मालकांनी / ताबेदारांनी / वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकपर्यत या कार्यालयात थकीत कर पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दिनांक 14 डिसेंबर, 2022 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलावा हा ई- लिलाव पध्दतीने दिनांक 15 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

4. सदर ई-लिलावामध्ये इच्छुक बोलीदारांना सदर सूचना प्रसिध्द करण्यात येत असून त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

5. ई-लिलाव पध्दतीने आवश्यक संक्षिप्त नमूद संकेत स्थळावर  उपलब्ध आहे. http://www.eauction.gov.in

6. ई- लिलाव प्रक्रियेमध्ये  सहभागी होऊ इच्छित असलेल्या बोलीदारांनी http://www.eauction.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक दस्ताऐवजांची  ऑनलाईन  तसेच ऑफलाईन पूर्तता करावी. (मुळ पॅनकार्ड व आधारकार्डची साक्षांकित प्रत तसेच वस्तू आणि सेवा कर (GST) नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र इ.

 जाहीर ई-लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुकांनी एकूण 14 (चौदा) वाहनांकरिता, खबरदारी ठेव रक्कम (Caution Maney Deposit) Dy.R.T.O. Jalgaon (payable at SBI Main Branch, Jalgaon) या नावे रुपये 70,000/- रक्कमेचा धनाकर्ष (डीमांड ड्राक्ट) रिजर्व बैंकेच्या नियमाच्या सीटीएस मानांकाप्रमाने दिनांक 1 डिसेंबर, 2022 ते  9 डिसेंबर, 2022  रोजी इतर सर्वात प्रति सकाळी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करुन नोंदणी करावी.

8. जाहीर लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी, अटकावून ठेवलेले स्थळ लिलावाच्या अटी व शर्ती  http://eauction.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आहेत. लिलाव रद्द  करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.                              0000000

जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलावाव्दारे विक्री

             जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 24 –  महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 अन्वये जमीन महसुलाची वसुली करणे बाबत तरतुद आहे. त्यानुसार श्री संजय धनश्याम शर्मा यांचेकडे करमणुक केबलची थकीत प्रलंबीत रक्कम रुपये 31,73,478/- प्रलंबीत असुन त्यानुसार प्रस्तुत थकबाकीची रक्कम पुर्णत: वसुल करण्यासाठी संबधित थकबाकीदार यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्ता त्यांची मेहरुण शिवरातील सामाईक मालकीचे नांव असलेली बिनशेती क्षेत्र गट नं. 463/1व2 मधील भुखंड 4 क्षेत्र 289 पैकी 72.25 चौ.मी. वर रक्कम  रुपये 31,73,478/- अक्षरी – ऐकतीस लाख त्रयात्तर हजार चारशे अठठयात्तर मात्र बोजा दाखल करण्यात आलेला आहे. करमणुक कराच्या थकबाकीचा बोजा बसवुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुदी नुसार लिलाव करुन थकबाकीची रक्कम लिलावाच्या रक्कमेतुन वसुल करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार फेरफार क्र/ 94002 दि. 8 जुलै, 2021 रोजी नोंद करण्यात आलेली असुन 7/12 उताऱ्यावर सरकार नांव लावण्यात आलेले आहे. तरी या जागेचे दिनांक 29 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय जळगाव येथे लिलाव करण्यात येत आहे.

          तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती लिलावातील जागा लिलावातील बोलहातची किंमत इत्यादी बाबत तहसिलदार जळगाव यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००

रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर, 2 022 पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 24    कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्हयातील, पांझरा, मालनगांव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्प असे एकूण 12 मध्यम प्रकल्प, लघु 45 प्रकल्प, को.प. बंधारे 22व वळण बंधारे 30 असे एकूण 109 प्रकल्प तसेच नंदूरबार जिल्हयातील , रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे एकूण 3, लघु 33 प्रकल्प, को.प. बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण 62 तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर,  2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी केले आहे.

          सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात  31 डिसेंबर, 2022 पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही.

              लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षीत करण्यात आलेला आहे. आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्विकारले जातील असेही कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००


मतदार यादीतील दुरस्तीबाबत दावे हरकती 9 डिसेंबर, पर्यंत स्विकारण्यात येतील

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 24  1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत  महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या  प्रारूप मतदार यादया दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आाहेत. या सर्व ठिकाणी प्रारुप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

          प्रारुप मतदार यादीमधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास दिनांक 9 डिसेंबर, 2022 पर्यंत स्विकारण्यात येतील, असे उप आयुक्त, सामान्य प्रशासन, नाशिक विभाग नाशिक रमेश काळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Wednesday, 23 November 2022

जळगाव ग्रंथोत्सव – 2022 स्वातंत्रयाचा अमृतमहोत्सव- सोमवार व मंगळवार 28 व 29 रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

             जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 23   महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 व 29 नोव्हेंबर, 2022 रोजी  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय परिसर महाबळ कॉलनी जळगाव येथे ग्रंथोत्सव – 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे.

            या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांना आपण मोठया संख्येने  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी केले आहे.

            सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर, 2022 रोजी  ग्रंथदिंडी – सकाळी 9 वाजता सागर पार्क ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव, सत्र पहिले - दुपारी  - 2 ते 4 वाजता – ताणतणाव व्यवस्थापन , सत्र दुसरे दुपारी 4 वाजेपासून खान्देशी बोलीभाषा कविसंमेलन सर्वांसाठी खुले या विषयावर  नाव नोंदणीसाठी संपर्क श्री. सुनील जगताप मो.न. 9921351982, कार्यक्रम सुरु होण्याच्या कमीत कमी एक तास अगोदर नावनोंदणी आवश्यक, सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, वरील कविसंमेलन हे सर्वांसाठी खुले असून आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त कवींनी सहभाग नोंदवावा  

            मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सत्र पहिले सकाळी 11 ते 1 वाजता परिसंवाद – प्रसारमाध्यमांचा वाचनसंस्कृतीवर होणारा परिणाम, सत्र दुसरे दुपारी 2 ते 4 वाजता हास्यरंग – थोड बसा आणि भरपूर हसा , दुपारी 4 वाजता प्रमाणपत्र वितरण, सत्कार सोहळा व समारोप कार्यक्रम,   असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव सुहास रोकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

शेतकऱ्यांनी अप्रमाणित किटकनाशक खरेदी करु नये

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 23   चाळीसगाव – किटकनाशकाची गुणवत्ता तपासणीसाठी मे. ॲग्रीको ऑरगॅनिक्स लिमिटेड, नवी दिल्ली उत्पादित किटकनाशक एसिटामिप्रिड 20 %  एस.पी. ट्रेड नाव – टाईमर बॅच नंबर U220113, पॅकींग 100 ग्रॅम या किटकनाशकाचा नमुना शासकीय किटकनाशक तपासणी प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आला होता. सदर किटकनाशकाचानमुना किटकनाशक तपासणी प्रयोगशाळेत तपासणीतअंती अप्रमाणित आढळून आला आहे. त्यामुळे या किटकनाशकाच्या शिल्लक साठयास विक्री बंदची कारवाई करण्यात आलेली आहे. तरी या बॅचचे या किटकनाशकाची शेतकरी बांधवांनी खरेदी करु नये असे आवाहन कृषि अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

सन 2022 करीता उत्कृष्ट लघु उद्योगांना जिल्हा पुरस्कार जाहिर

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 23    जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासन मार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कार प्राप्त उद्योजकास प्रथम क्रमांकास रुपये 15,000/- व व्दितीय क्रमांकास रुपये 10,000/- व मानचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देण्यात येते. सदर पुरस्कारासाठी लघु उद्योजकांची निवड त्यांनी केलेली भांडवली गुंतवणुक तंत्रज्ञान, स्वालंबन, उद्योजकता, कौटुंबिक पार्श्वभुमी, उत्पादीत वस्तुंची गुंणवत्ता, निर्यातक्षमता इ. बाबीचा विचार राष्ट्रीय पुरस्कारा प्रमाणे जिल्हा पुरस्कार यशस्वी उद्योजक निवडीसाठी निकष असतात. त्याप्रमाणे नोंदणीकृत लघु उद्योग घटकांची मागील तीन वर्षातील स्थिर भांडवल गुंतवणुक, रोजगार निर्मिती व नफयांची वाढ विचारात घेतली जाते. घटकाचे उत्पादनासाठी वापरलेले तंत्रज्ञान गुणवत्ता प्राप्त उत्पादन, मशिनरी व बिल्डींग मेन्टेनन्स, कामगार कल्याणासाठीच्या योजना यांचा विचार करुन या बरोबरच थकबाकी येत नाही. याची खात्री वित्तीय संस्थेकडुन केली जाते. जिल्हास्तरीय सल्लागार उपसमितीने सदर बाबींची सुक्ष्म छाननी करुन घटकांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर मुल्यांकन करुन सदर समिती कडुन यशस्वी उद्योगजकांची निवड केली जाते.

          तरी जिल्हयातील गेल्य तीन वर्षा अगोदर उत्पादन सुरु असलेल्या व वरील निकषा नुसार जास्तीत जास्त उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव येथे समक्ष संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी करणे बाबत आवाहन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 23  1 नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारूप मतदार यादी दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 रोजी पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रारूप यादीनुसार आतापर्यंत जिल्हयात एकूण 24211 पदवीधर मतदार नोंदणी झालेली आहे. या प्रारूप मतदार यादीची प्रत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देखील देण्यात येत असून यापूर्वी नमूना 18 भरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी केलेल्या पदवीधर नागरिकांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीत असलेबाबत खात्री करुन घ्यावी.

          पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज करुनही ज्यांची नावे काही कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होवू शकली नाहीत किंवा ज्यांची नाव नोंदणी अद्याप बाकी आहे त्यांना दिनांक 23 नोव्हेंबर,2022 ते 9 डिसेंबर,2022  या कालावधीत नमूना 18 भरून नाव नोंदणी करता येईल. याशिवाय प्रारूप यादीतील नोंदीवर ज्यांना दावे किंवा हरकती दाखल करावयाच्या असतील त्यांनी लागू असेल असा नमुना 18, नमुना 7 किंवा नमुना 8 भरुन वरील कालावधीत दाखल करता येतील.

 तरी पात्र पदवीधर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा,  व पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी

करून घ्यावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव यांचेवतीने करण्यात येत आहे. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

Tuesday, 22 November 2022

गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणे बाबत

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 22मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे कडील जनहित याचिका क्र. 02/2022 मधील दिनांक 15 सप्टेंबर, 2022 व दिनांक 6 ऑक्टोंबर, 2022 च्या आदेशान्वये शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत या वर्षाअखेर निष्कासित करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

          जळगाव जिल्हयातील तालुकानिहाय शासकीय व गायरान जमीनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.jalgaon.gov.in  या संकेतस्थळावर तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर शासकीय तसेच गायरान जमीनीवर कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही प्रयोजनासाठी विनापरवानगीने वापरात आणुन त्यावर अतिक्रमण केले असेल अशा सर्व व्यक्तींनी सदरचे अतिक्रमण स्वत:हून 24 तासांत काढून घ्यावे व शासनास सहकार्य करावे, अतिक्रमणधारकाने स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनातर्फे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

गुरुवार 21 रोजी ऑनलाईन स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 22जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 12 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे मॉडेल करिअर सेंटर व्दारा, स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

          या मार्गदर्शन सत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे मॉडेल करिअर सेंटर व्दारा, कु. सीमा शर्मा, यंग प्रोफेशनल हे  मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यांत आलेले आहे. गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे

 गुगल मिट लिंक-meet.google.com/wgv-ddnz-ypf

          तरी जिल्हयातील जास्तीत जास्त युवक / युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००