जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे, यांचे अधिनस्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत नागरीकांना पुरविण्यात येत असलेल्या विविध लोकसेवा बाबत नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलिय आणि व्दितीय अपिलिय प्राधिकारी या बाबी अधिसूचित केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या नोकरी करणाऱ्या
महिलांसाठीच्या वसतीगृहाच्या योजनेतंर्गत अशासकीय संस्थांच्या शिफारशी करणेसाठी 75
दिवसांची कालमर्यादा विहित केली आहे.
त्यासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जळगाव, प्रथम अपिल अधिकाऱी म्हणून उपआयुक्त
महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक, व्दितीय अपिल अधिकाऱी म्हणून सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे, यांना तर
समुपदेशन केंद्र चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना निधी उपलब्ध करुन देणे
तर यासाठी 180 दिवसांची कालमर्यादा विहित केली आहे. अधिकारी म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव, प्रथम
अपिल अधिकाऱ्यारी म्हणून. उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग, नाशिक,
व्दितीय अपिल अधिकाऱी म्हणून सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र
राज्य पुणे, यांना नामनिर्देशित करण्यात
आले आहे. असे डॉ. वनिता दि. सोनगत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव. यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment