जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 7 व 8 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील विविध कंपन्यांनी एकूण 127 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक
उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात
सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना
ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व
पासवर्ड ने लॉगिन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी
विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांवनोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व
पासवर्ड ने लॉगिन करुन ॲप्लाय करावा.
याबाबत
काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या
वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे आवाहन वि. जा. मुकणे,
सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment