Friday, 4 August 2023

आरटीओ मार्फत वाहनचालकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर

 जळगाव, दि.४ ऑगस्ट (जिमाका) -  जिल्ह्यातील खासगी बस चालक, अवजड वाहन चालक, एसटी बसचालक, शासकीय वाहन चालक, ऑटोरिक्षा टैक्सी संघटना, मोटार ड्रायविंग स्कूल  प्रशिक्षक व चालक यांच्यासाठी  ३ ऑगस्ट पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा सभागृहात नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

स्कूलबस चालकांनी दिनांक ५ ऑगस्ट, ऑटोरिक्षा/ टॅक्सी/ ट्रक/ खासगी बसचालक - ८ ऑगस्ट,  परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक - १० ऑगस्ट,  स्कूलबस चालक  - १२ ऑगस्ट,  परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक-  १७ ऑगस्ट, ऑटोरिक्षा/ टॅक्सी/ ट्रक/ खाजगी बसचालक  - १९ ऑगस्ट,  मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षक व चालक- २२ ऑगस्ट, परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक - २४ ऑगस्ट, शासकीय वाहनांचे चालक - २६ ऑगस्ट, परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक - ३१ ऑगस्ट या तारखेला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ वाजेच्या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 

शिबीराचा लाभ घेण्यासाठी वाहनचालकांनी  यांनी स्वत:चे आधार कार्ड व परिवहन संवर्गातील  (Transport) लायसन्स आणणे बंधनकारक आहे. असे ही श्री.लोही यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

                                                      0000000000000000000

No comments:

Post a Comment