जळगाव दि. 1 ( जिमाका ) - जळगांव जिल्हयातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक व जळगांव जिल्हयात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणारे सर्व अनुसूचित जमातींच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आलेले असून http://mahadbt/mahait.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करणे आवश्यक आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरणेस सुरुवात झालेली असून जुने/नवीन विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित असलेले व त्रुटीयुक्त अर्ज तात्काळ निकाली काढणेत यावेत. महाविद्यालयांनी शासननिर्णयातील अटी व शर्तीनुसार पात्र असलेले ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज तात्काळ पडताळणी करावी. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टलवर दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे व नियमांचे वाचन करावे. त्रुटीच्या पूर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारणा करुन पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील. शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांचे आधारसंलग्न बँक खात्यात हस्तांतरीत होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे बैंक खाते आधारसंलग्न करणे अत्यावश्यक राहील.
सन
2023-24 या शैक्षणिक वर्षातील 452 इतके अर्ज महाविद्यालयाचे स्तरावर प्रलंबित
असलेले अर्ज शासननिर्णयाचे अधीन राहून शक्य लवकरात लवकर निकाली काढावे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर
योजनेबाबत विहित वेळेत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment