जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे.
या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक
प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा
योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. उमेदवारांनी इंटर्नशिपच्या संधीसाठी
https://pminternship.mca.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी.
या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज
करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी
साठी अर्ज करावा. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिप साठी
अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे. या अंतर्गत युवकांना
बारा महिन्यासाठी इंटर्नशिप मिळेल या सोबतच त्यांना दरमहा ५००० रुपये ही मिळतील. याशिवाय
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.
या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी फायदा
घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. संदीप गायकवाड यांनी केले आहे.
०००००००००
No comments:
Post a Comment