जळगाव दि. 10 ( जिमाका वृत्तसेवा )- आदिवासी विकास विभागातंर्गत इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता अभियांतत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करुन घेणे करिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येते आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आय.आय.टी मधील अभ्यासक्रमांना जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीचे होणार आहे.
यासाठी
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 10 वी नंतर 2 वर्ष
कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये
अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठभ् आदिवासी विकास
विभाग शासन निर्णय क्रमांक शाआशा 1122प्र.क्र/213-का/13 दिनांक 14 ऑक्टोंबर, 2024
या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या
निवडी करिताचाळणी परिक्षा मे महिन्यात चाळणी परिक्षा घेतली जाणार आहे. सदर चाळणी
परिक्षेकरिता जे विद्यार्थी मार्च 2025 च्या 10 वीच्या परिक्षेस बसलेले आहेत अशा
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापका मार्फत प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्, यावल जि. जळगाव यांचे कडे दिनांक 30 मार्च, 2025
पूर्वी अर्ज करावेत, आवेदन पत्राचा नमुना प्रकल्प कार्याल, यावल येथे उपलब्ध आहे.
सदर
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थ्यांच्या पालकांचे
वार्षिक कमाल उत्पन्न रु. आठ लाखापेक्षा कमी असावे, अर्जा सोबत सक्षम अधिकाऱ्यांनी
दिलेला जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. सदर परिक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी
त्याच शैक्षणिक वर्षात (2024-25) 10 वी उत्तीर्ण असावा. तरी जास्तीत जास्त
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या
सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प यावल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (02557-261432 वर
संपर्क साधावा
०००००००००
No comments:
Post a Comment