Wednesday, 9 July 2025

ज्वारी, मका व बाजरी खरेदीच्या मुदतीत 20 जुलैपर्यंत वाढ

 जळगाव दि – 09 ( जिमाका ) : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 मध्ये ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी करण्यात येणार आहे.

               जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगांव व चाळीसगांव असे एकूण 18  खरेदी केंद्र कार्यरत राहणार आहेत. भरडधान्य ज्वारी, मका, बाजरी खरेदीकरिता आता 20 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

रब्बी हंगामातील हमीभाव पुढीलप्रमाणे आहेत :

* ज्वारी : रुपये ३३७१/- प्रति क्विंटल

* मका : रुपये २२२५/- प्रति क्विंटल

* बाजरी : रुपये २६२५/- प्रति क्विंटल

                तरी शेतकरी बंधुंनी ज्वारी, मका व बाजरी खरेदीचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंत्री गिरीष महाजन,  पालकमंत्री गुलाबराव पाटील,

विभागीय संचालक  संजय वामनराव सावकारे,महाराष्ट्र राज्य पणन महासंघ लि. चे उपाध्यक्ष रोहित निकम,

 संचालक संजय मुरलीधर पवार व एस. एस. मेने (प्र.जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0000000000

No comments:

Post a Comment