जळगाव दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) -: विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्र शासन विकसित महाराष्ट्र २०४७ साठी स्वतःचा आराखडा तयार करत आहे. या उपक्रमाचा उद्देश एक प्रगत आणि भविष्यकालीन महाराष्ट्र घडवण्याचा आहे, ज्यामध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता यावर विशेष भर दिला जात आहे. हे घटक सक्षम कार्यबल निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्र शासनाने "विकसित महाराष्ट्र २०४७" या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांचे विचार, अपेक्षा व समस्या समजून घेणे अत्यावश्यक असल्याने दिनांक १८ जून २०२५ पासून संपूर्ण राज्यात नागरिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून १७ जुलै ही अंतिम तारीख आहे.
सर्वेक्षणात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा
सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शासनाने सर्व विभागांना व प्रशासन यंत्रणेला व्यापक
जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये ग्रामसेवक, आशा
कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालये, स्थानिक केबल नेटवर्क, एफ.एम.
रेडिओ, साप्ताहिके, वर्तमानपत्रे, बाजारपेठा, गावाच्या वेशीवर फलक, व्हाट्सअॅप
ग्रुप, पथनाट्य आणि फिरती प्रचारवाहने आदी माध्यमांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या
या उपक्रमाचा उद्देश २०४७ पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्यांच्या अग्रभागी नेणे
हा असून, त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक
आहे.
या
सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या
व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न
विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू
शकता.विकसित भारत च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र २०४७ साठी एक
व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी
नागरिक सर्वेक्षण केले जात आहे. https://wa.link/o93s9m या लिंकवर माहिती भरण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
00000000000
No comments:
Post a Comment