जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन हे रविवारी 10 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर असून दौरा पुढील प्रमाणे.
दुपारी 3 वाजता ते जळगाव विमानतळावर आगमन
करून मोटारीने तोंडापूर, ता. जामनेर येथे रवाना होतील. दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी
महाराज “शिवसृष्टी” उद्घाटन
व लोकार्पण सोहळ्यास, तसेच जाहिर सभेस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे
भोसले, यांच्या समवेत उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
सायंकाळी 4.40 वाजता तोंडापूर येथून फत्तेपुर
येथे आगमन करून “शिवसृष्टी” उद्घाटन व लोकार्पण सोहळा,
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रीड अॅन्युटी मॉडेल (HAM-2) अंतर्गत विविध
प्रकल्पांच्या ई-भूमीपूजन सोहळ्यास दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहतील.
यानंतर सायंकाळी 5.40 वाजता फत्तेपुरहून
जामनेर येथे त्यांच्या खाजगी निवासस्थानी सदिच्छा भेट, तर 6.30 वाजता वीन हेरिटेज शासकीय
विश्रामगृह इमारतीची पाहणी करून सायंकाळी 6.50 वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील. रात्री
7.20 वाजता ते जळगाव विमानतळावरून पुढील प्रवासासाठी रवाना होतील.
वस्त्रोद्योगमंत्री
संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
००००००००००००
No comments:
Post a Comment