जळगाव, दि. 31 (जिमाका) - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000


No comments:
Post a Comment