Saturday, 17 February 2018

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान




         जळगाव, दि. 16 - शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाउ उमेदवारांची 106 वी अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा (सेंकड राउंड) 20 ते 22 फेब्रुवारी, 2018 या दरम्यान (ऑनलाईन) घेण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
            विदयार्थ्यानी आपले हॉलतिकिट dgt.cbtexam.in  या पोर्टलवरुन उपलब्ध करुन घ्यावेत. हॉलतिकिट काढल्यानंतर बीटीआरआय, जळगाव येथून फोटो लावुन प्रमाणित करुन घ्यावे. अन्यथा विद्यार्थ्यांना परिक्षेस बसता येणार नसल्याची नोंद घ्यावी. असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी, सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment