Monday, 11 June 2018

विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी एन.के.पोयम निवडणूक निरीक्षक


          जळगाव दि.11:- विधान परिषद नाशिक  विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2018 साठी निवडणूक निरीक्षक जाहिर झाले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील श्री.एन.के.पोयम यांची निवडणूक निरीक्षक म्हणून अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी श्री.एस. घोष महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती केली आहे.
0000000

No comments:

Post a Comment