Monday, 16 July 2018

वसतीगृहे व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर


       जळगाव, दि.16:- जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सबंधित विभागांना  दिल्या,
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची सभा घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते, या बैठकीस जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील  जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी (मा) शिक्षाणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा बाल विकास अधिकारी , यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणा-या शासकीय वसतीगृह,शासकीय निवासी शाळा,विजाभज आश्रमशाळा ,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, शिष्यवृत्ती ,रमाई आवास योजना या योजनांचा सविस्तर आढावा घेतला.  ते पुढे म्हणाले की, जिल्हयात 12 शासकीय वसतिगृहे, 1 निवासी शाळा व 46 विजाभज आश्रमशाळा असून यात  शिक्षण घेणा-या नवीन विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सबंधित विभागाने पूर्ण केलेली असेलच . या  विद्यार्थ्याची नियमित आरोग्य तपासणी करावी, तसेच चालू वर्षी उपलब्ध तरतूदीच्या अधीन नियमानुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी. मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची इसीएसची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी , एकही  पात्र  विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून  वंचित राहणार नाही, यांची दक्षता संबधित विभागाने घ्यावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
        जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले की, जिल्हयातील  शासकीय वसतीगृहे, आश्रमशाळेत मोठया प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक असून अशा आश्रमशाळा वसतीगृहांची  सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने  दुरुस्ती करण्यासाठी होणा-या खर्चाबाबत आढावा घेण्यासाठी  बैठक लावावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी सबंधितांना दिल्या.
००००

No comments:

Post a Comment