जळगाव,
दि.16:- अनुसूचित जाती /जमाती (प्रतिबंधक) नियम व त्या खालील अनुसूचित जमाती
(अत्याचार प्रतिबंधक) नियमांतर्गत पोलिसात दाखल गुन्हयांचा
तपास संबंधित यंत्रणांनी तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी दिले,
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक कामकाज
सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते यावेळी समाज कल्याण अधिकारी
योगेश पाटील सहाकरी अभियोक्ता केतन ढाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक के.बी. बोदडे,
कार्यकारी अभियंता एस.व्ही अहिरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक
एस.एम, गायकवाड,व इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
सांगितले की, मे 2018 पूर्वीच्या सर्व प्रकरणांमध्ये या समितीच्या कर्तव्या
प्रमाणे निधी वाटपाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
यांनी पोलिस विभागाकडे दयावी, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आणि
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी संयुक्त
अहवाल सद्यस्थितीसह सादर करावा, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी मागील सभेतील ठराव व केलेल्या कार्यवाहीवर या कायद्यानुसार पोलिसात दाखल
करण्यात आले, गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे तसेच काही प्रलबित प्रकरणे हायकोर्टात तातडीने दाखल करावीत अशा सुचना संबधितांना
दिल्या, या कायद्यांतर्गत देण्यात येणारे आर्थिक सहाय्य, मदत पुनर्वसनाबाबतचा सविस्तर आढावा
जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला घेतला.
यावेळी समाज कल्याण अधिकारी योगेश
पाटील चांनी सांगितले की, माहे जुन 2018 मध्ये 9
गुन्हे दाखल झालेले असून आतापर्यन्त माहे जुन अखेर 35 गुन्हे तपासावर
प्रलबित आहेत.माहे जुन 2018 अखरे 25अत्याचार पिढीतांना अर्थसहाय्य देण्यात आले
असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment