जळगाव दि. 1 - संघ लोकसेवा आयोग ( UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत
कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी 3 फेब्रुवारी, 2019 रोजी घेण्यात येणा-या
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या
परिक्षेकरीता दिनांक 31 ऑक्टोबर, 2018 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिध्द
झाली आहे.
संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज
भरण्याची अंतिम मुदत दिनांक 26 नोव्हेंबर, 2018 अशी आहे. ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी http:www.upsconline.nic.in
या वेब साईटचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परिक्षेव्दारा
कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते.
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS)
या परिक्षेपूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,
नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 16
नोव्हेंबर, 2018 ते 29 जानेवारी 2019 या कालावधीत CDS कोर्स क्र. 57 चे आयोजन
करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची
नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य
दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव
येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2018 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक
कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन किंवा गुगल
प्लस मध्ये PCTC Training असे सर्च करुन
त्यामधील CDS-57 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट
घेवून ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी,
छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031
आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा. असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment