Friday, 17 May 2019

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा


            जळगाव, दि. 17 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार, दिनांक 18 मे, 2019 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
            शनिवार, दि. 18 मे, 2019 रोजी सकाळी 7.00 वा. महाराष्ट्र एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना, आगमन व राखीव. सकाळी 8.30 वा. चाळीसगाव शासकीय विश्रामगृह येथून हिरापूर ता. चाळीसगाव कडे मोटारीने प्रयाण. सकाळी 8.45 वा. हिरापूर येथे आगमन व टंचाई  परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 9.45 वा. वाघळी ता. चाळीसगाव येथील टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 10.45 वा. तरवाडे खुर्द ता. पारोळा येथे पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 11.00 वा. मोहाडी ता. पारोळा येथे टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी  12.30 वा. शासकीय विश्रामगृह अमळनेर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वा. मंगरुळ ता. अमळनेर येथे टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 2.30 वा. अनोरे ता. अमळनेर येथे टंचाई परिस्थीतीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा, दुपारी सोयीनुसार पाणी फाउंडेशनच्या कामास भेट, दुपारी सोयीनुसार आर्डी येथील गाळमुक्त धरण कामाची पाहणी, दुपारी 3.30 वा. ढेकू सिम ता.अमळनेर येथील टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा, सायं. 4.00 वा. अमळनेर येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 9.55 वा. जळगाव रेल्वे स्थानक येथून आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
०००००

No comments:

Post a Comment