जळगाव,
दि. 17 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक
उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार, दिनांक 18
मे, 2019 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे-
शनिवार,
दि. 18 मे, 2019 रोजी सकाळी 7.00 वा. महाराष्ट्र एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे
स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना, आगमन व राखीव. सकाळी 8.30 वा.
चाळीसगाव शासकीय विश्रामगृह येथून हिरापूर ता. चाळीसगाव कडे मोटारीने प्रयाण.
सकाळी 8.45 वा. हिरापूर येथे आगमन व टंचाई
परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 9.45 वा. वाघळी ता. चाळीसगाव
येथील टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 10.45 वा. तरवाडे खुर्द
ता. पारोळा येथे पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 11.00
वा. मोहाडी ता. पारोळा येथे टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह अमळनेर येथे आगमन
व राखीव. दुपारी 1.30 वा. मंगरुळ ता. अमळनेर येथे टंचाई परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी
चर्चा. दुपारी 2.30 वा. अनोरे ता. अमळनेर येथे टंचाई परिस्थीतीचा आढावा व शेतकऱ्यांशी
चर्चा, दुपारी सोयीनुसार पाणी फाउंडेशनच्या कामास भेट, दुपारी सोयीनुसार आर्डी येथील
गाळमुक्त धरण कामाची पाहणी, दुपारी 3.30 वा. ढेकू सिम ता.अमळनेर येथील टंचाई परिस्थितीचा
आढावा व शेतकऱ्यांशी चर्चा, सायं. 4.00 वा. अमळनेर येथून मोटारीने जळगावकडे
प्रयाण. सायंकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री
9.55 वा. जळगाव रेल्वे स्थानक येथून आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
०००००
No comments:
Post a Comment