Wednesday, 28 February 2018

मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न



       जळगाव, दि. २८- वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या गौरवदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात एक दिवशीय ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनात वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले व त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे, तसेच मराठी भाषा समृध्द होण्यासाठी लिहिण्यात आलेल्या विविध ग्रंथांचा समावेश करण्यात आला होता.
       यावेळी सुदाम पाटील, संचालक, जळगाव जिल्हा सहकार बोर्ड, श्री. प्रमोद पाटील, ग्रंथालय चळवळीशी संबंधित असलेले वाचक व अभ्यासक यांचेसह प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव, श्री. ठाकूर, श्री. शिंदे, श्री. चौधरी, श्री. मगन पाटील उपस्थित होते.
000

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षण मोफत 7 मार्च रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन



        जळगाव, दि. २८ - संघ लोकसेवा आयोग भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून Service Selection Board (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १३ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.  या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
          जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी नमूद पात्रता पूर्ण करीत असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ७ मार्च, २०१८ रोजी कार्यालयीन वेळेत मुलाखतीस स्वखर्चाने हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Googlc plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्वाच्या तारखा (Important Dates) यांचे अवलोकन करावे. त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पुर्ण भरुन आणावे.
          या प्रशिक्षणास प्रवेश मिळण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षणास येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. कंबाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेले असावे. त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन. सी. सी. चे सी सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावे. एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी  कॉललेटर असावे. University Entry Scheme साठी एस.एस.बी. कॉललेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
         अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रमांक-0253-2451031  व 2451032  वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
000

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ५ मार्चला आयोजन



        जळगाव, दि. 28 - जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्यातील लोकशाही दिन सोमवार 5 मार्च, 2018 दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन भवनात आयोजित करण्यात आला आहे.
        या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  केले आहे.
000

Tuesday, 27 February 2018

मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन नियम 1956 मध्ये सुधारणा



        जळगाव दि. 27- महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम (1948 चा 67) याच्या कलम 82 च्या पोट-कलम (2) च्या खंड (इइ) तसेच कलम 17 ब च्या पोट-कलम (1) व कलम 18 च्या खंड (अ) यांव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासनाने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन नियम, 1956 मध्ये सुधारणा करण्याचे योजिलेल्या नियमांचा मसुदा हा महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम (1948 चा 67) याच्या कलम 82 च्या पोट-कलम (3) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याव्दारे बाधा पोहोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर 30, 2017/पौष 9, शके 1939 असाधारण क्रमांक 431 अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे. अशी माहिती कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचेतर्फे एका प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे.
000

शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसीए) परिक्षेसाठी 28 मार्चपूर्वी ऑनलाईन अर्ज भरावेत



        जळगाव, दि. 27 - शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परिक्षा 26 ते 28 मे, 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परिक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 मार्च, 2018 पर्यंत आहे. अशी माहिती विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
            परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सहकार विभागाच्या www. Mahasahakar.maharashtra.gov.in व www.sahakaryukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर अधिसुचना सहकार विभागाच्या www.mahasahakar.maharashtra.gov.in www.sahakaryukta.maharashtra.gov.in या संकेतस्थावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
            जे परीक्षार्थी ही परिक्षा देवू इच्छितात, अशा परिक्षार्थींनी परिक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.
000