Tuesday, 20 February 2018

शस्त्र परवानाधारकांची माहिती 31 मार्चपूर्वी नदाल (NDAL) प्रणालीमध्ये नोंदवावी

           जळगाव, दि. 20 - शस्त्र परवानाधारक, शस्त्र/दारुगोळा खरेदी-विक्री परवानाधारकांनी आपली माहिती 31 मार्चपूर्वी नदाल (NDAL) प्रणालीमध्ये नोंदवून युनिक आयडेन्टीफिकेशन नंबर (UIN) प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा त्यांचा शस्त्र परवाना रद्द होईल. असे जिल्हादंडाधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.          
          गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी 12 फेब्रुवारी, 2018 च्या पत्रान्वये NDAL या संकेतस्थळावर शस्त्र परवानाधारक यांना UIN ( UNIQUE IDENTIFICATION NUMBER) क्रमांक प्राप्त करुन घेणेचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार 31 मार्च, 2016 पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवानाधारक, शस्त्र/ दारुगोळा खरेदी-विक्री परवानाधारक यांची माहिती NDAL या प्रणालीमध्ये नोंदवून UIN ( UNIQUE IDENTIFICATION NUMBER) क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढवून देण्यात येणार नाही. UIN क्रमांक असल्याशिवाय कोणताही शस्त्र परवाना, शस्त्र/दारुगोळा खरेदी-विक्री परवाना वैध असणार नसल्याचे कळविले आहे.
         जळगाव जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी UIN क्रमांक प्राप्त करुन घेणेबाबत जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालयात त्यांच्या शस्त्र परवान्यासह 31 मार्च, 2018 पूर्वी उपस्थित रहावे. त्यानंतर शस्त्रपरवानधारक यांची  NDAL प्रणालीवर नोंदणी करण्यात येणार नाही. व UIN क्रमांक नसलेले सर्व शस्त्र परवाने रद्द होतील व त्यांची शस्त्र बेकायदा समजून सरकार जमा केली जातील. असे जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
                                                                      ०००

No comments:

Post a Comment