Wednesday, 28 February 2018

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षण मोफत 7 मार्च रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन



        जळगाव, दि. २८ - संघ लोकसेवा आयोग भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून Service Selection Board (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १३ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.  या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
          जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी नमूद पात्रता पूर्ण करीत असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ७ मार्च, २०१८ रोजी कार्यालयीन वेळेत मुलाखतीस स्वखर्चाने हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Googlc plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्वाच्या तारखा (Important Dates) यांचे अवलोकन करावे. त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पुर्ण भरुन आणावे.
          या प्रशिक्षणास प्रवेश मिळण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षणास येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. कंबाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेले असावे. त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन. सी. सी. चे सी सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावे. एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी  कॉललेटर असावे. University Entry Scheme साठी एस.एस.बी. कॉललेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
         अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रमांक-0253-2451031  व 2451032  वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment