Tuesday, 6 February 2018

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

     जळगाव, दि. 6 - राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील हे बुधवार दि. 7 फेब्रुवारी,  2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

            बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 8 वा. 30 मि. नी. मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने जळगावकडे रवाना. सकाळी 9 वा. 30 मि.नी. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, जळगावकडे रवाना. सकाळी 9 वा. 45 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. 45 मि. नी. दिपस्तंभ फाऊंडेशन, जळगाव आयोजित दीपस्तंभ फाऊंडेशन पुरस्कार सोहळा 2018 वितरण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- कांताई सभागृह, जळगाव. (संदर्भ - श्री. यजुर्वेद महाजन, कार्यकारी संचालक) दुपारी 12 वा. 30 मि. नी. शासकीय वाहनाने सागर पार्क, जळगावकडे प्रयाण. दुपारी 12 वा. 45 मि. नी. आगमन व बहिणाबाई महोत्सवास उपस्थिती. स्थळ- सागर पार्क, जळगाव. दुपारी 2 वा. सागर पार्क, जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव विानतळाकडे प्रयाण. दुपारी 2 वा. 15 मि. नी. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने कोल्हापूरकडे रवाना.
                                                                    ०००

No comments:

Post a Comment