जिमाका-जळगाव,
दि. 5 :- दर महिन्याच्या
पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अपर जिल्हाधिकारी
गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. जिल्हाभरातून आलेल्या
नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या
जागेवर जावून जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 224 तक्रार अर्ज दाखल
झाले.
या
लोकशाही दिनास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी
उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, जिल्हा उपनिंबधक,
सहकारी संस्था विशाल जाधवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, तहसीलदार मंदार कुलकर्णी, महावितरणचे
अधिक्षक अभियंता बनसोडे, यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment