जळगाव, दि. 7 - आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2017-18 या शैक्षणिक वर्षा करीता भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, योजनांचे अर्ज भरणेपासून महाडीबीटी मधुन सुट देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पुर्वीचे (ई- स्कॉलरशिप) अर्ज https://etribal.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भरावेत.
जिल्ह्यातील प्राचार्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेल्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे चालु शैक्षणिक वर्ष 2017-18 तसेच 2012-13 पासूनचे प्रलंबित शिष्यवृत्तीचे ऑनलाईन बी-स्टेटमेंट प्रमाणित करुन प्राचार्य व विद्यार्थी यांचे विहित बंधपत्रासह (इन्डेम्निटी बॉन्ड) 15 फेब्रुवारी, 2018 पर्यंत प्रकल्प कार्यालयास सादर करावेत. असे आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी कळविले आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढून आपला आधार नंबर विद्यार्थी प्रोफाईलमध्ये अद्यावत करावा व बॅंकखात्यास आधारसंलग्न करावे. जे विद्यार्थी आपला युझर आयडी विसरले असतील किंवा आधार नंबर ऑनलाईन अद्यावत होत नसेल किंवा उत्पन्ना विषयी सुधारणांसाठी https://goo.gl/forms/RBAfScNfV४०BmNK६२ या लिंक वर क्लिक करावे. यासंबंधी प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:
Post a Comment