जळगाव दि. 23- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून
नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या विविध 16 सेवा 1 मार्च पासून ऑन लाईन करण्यात
आलेल्या आहेत.
ऑनलाईन करण्यात आलेल्या सेवा या प्रमाणे :- वाहन
हस्तांतरण नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरण नोंद, लिलाव प्रक्रियेत
विक्री करण्यांत येणारे वाहनाची नोंद, नोदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल नोंद,
वाहनावर कर्जबोझा नोंदविणे, वाहनावरील कर्जबोझा रद्द केल्याची नोंद घेणे, दुय्यम
नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे. वाहनांस ना हरकत प्रमाणपत्र देणे, वाहनांचे योग्यता
प्रमाणपत्र नुतनीकरण व त्यासाठी पूर्वनियोजित वेळ ठरविणे, वाहनातील बदल केल्याची
नोंद घेणे, योग्यता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत जारी करणे, वाहनाची पुर्न: नोंदणी,
वाहनाच्या प्रकारात बदल करणे, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे, नविन व्यवसाय
प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, अनुज्ञप्तीविषयक शुल्क भरणा (शिकाउ, पक्की, नुतनीकरण,
दुय्यक अनुज्ञप्ती इ.)
ऑफलाईन सेवा
उपप्रादेशिक कार्यालयाने ऑनलाईन न
करण्यात आलेल्या सेवा पर्यावरण कर, व्यवसाय कर, खटला विषयक कामकाज, अन्य
कार्यालयातून तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र घेवून येणाऱ्या वाहनांचे कामकाज, परवाना
विषयक सर्व कामकाज, आकर्षक/पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क, पोस्ट बटवड्याचे परत
आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे शुल्क ( Smart Card RC Return) असून सदर कामकाज
कार्यलयात करण्यात येणार आहे.
कार्यालयीन
संगणकीय अभिलेखावर जी वाहने नाहीत अशा वाहन धारकांनी प्रथम त्यांचे वाहनाची माहिती
संगणकीकृत करण्यासाठी वाहनाची मुळ कागदपत्र बॅकलॉग एन्ट्री करणेसाठी संबंधित
विभागात सादर करावित. त्यानंतर वरील सेंवाप्रमाणे ऑनलाईन अर्ज कार्यालयात सादर करावेत.
परिवहन
विभागाचे संकेत स्थळ www.parivahan.gov.in व नागरिकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाचे www.transport. maharashtra.gov.in या संकत
स्थळावर जळगाव जिल्हयातील नागरिक सुविधा केंद्राची यादी (CSC सेंटर) उपलब्ध करुन
देण्यात आलेली आहे.
नागरिकांच्या
सोयीसाठी वरील सेवांसाठी या कार्यालयात जनसंपर्क कक्ष स्थापन करण्यात आला असून
श्री. सचिन सानप, कनिष्ठ लिपीक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. व अधिक माहितीसाठी
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे www.mh19@mahatranscom.in वर संपर्क
साधावा. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment