जळगाव, दि. 27 - शासकीय सहकार व लेखा पदविका
(जी.डी.सी.अँड ए ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम)
परिक्षा 26 ते 28 मे, 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी
परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त
अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परिक्षेचे ऑनलाईन अर्ज
भरण्याची मुदत 28 मार्च, 2018 पर्यंत आहे. अशी माहिती विशाल जाधवर, जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
परिक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज सहकार विभागाच्या www. Mahasahakar.maharashtra.gov.in व www.sahakaryukta.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर अधिसुचना सहकार
विभागाच्या www.mahasahakar.maharashtra.gov.in व www.sahakaryukta.maharashtra.gov.in
या संकेतस्थावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
जे
परीक्षार्थी ही परिक्षा देवू इच्छितात, अशा परिक्षार्थींनी परिक्षेसंदर्भात आवश्यक
ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहन श्री.
जाधवर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment