Friday, 31 August 2018

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा


     जळगाव, दि. 31 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 2 सप्टेंबर, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            रविवार दि. 2 सप्टेंबर, 2018 सकाळी 8.13 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. आगमन व राखीव. सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून वाहनाने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. मुक्ताईनगर येथे आगमन  व आ. एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसवर राखीव. सकाळी 11.10 वा. शासकीय तंत्र निकेतन (अल्पसंख्यांक) इमारतीचे भुमीपुजन समारंभास उपस्थिती. (स्थळ:- मुक्ताईनगर, जि.जळगाव), सकाळी 11.40 वा. आ. एकनाथराव खडसे यांच्या अभिष्टाचिंतन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ :- संत मुक्ताई मंदिर कोथळी, मुक्ताईनगर, जि.जळगाव), दुपारी 1.00 वा. संत मुक्ताई मंदिर, कोथळी येथून वाहनाने                            आ. एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा आ. एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊस, मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वा. मुक्ताईनगर येथून वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. आगमन व रेशन दुकानदार संघटनेच्या मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ :- जळगाव पत्रकार भवन, जळगाव), दुपारी 3.45 वा. शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 वा. शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत शासकीय कामकाजाबाबत चर्चा. (स्थळ:- शासकीय विश्रामगृह, जळगाव), सायं. 7.00 वा. दैनिक तरुण भारत आयोजित तरुण उद्योजकांशी थेट संवाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- हॉटेल प्रेसिडेंट, एमआयडीसी, जळगाव), रात्री 9.15 वा. वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.53 वा. जळगाव येथून आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
000000

जिल्ह्यात मनाई आदेश जारी


        जळगाव, दि. 31 - सद्यस्थितीत जिल्ह्यातील कायदा सुव्‍यवस्था अबाधित रहावी. यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश  31 सप्टेंबर, 2018 पर्यंत अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी कळविले आहे.
०००

औरंगाबाद येथे 25 सप्टेंबर रोजी डाक अदालत


        जळगाव, दि. 31 - औरंगाबाद क्षेत्रा संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 25 सप्टेंबर, 2018 रोजी दुपारी 2.00 वाजता डाक अदालतचे आयोजन केले आहे.
            नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत एस. एस. परळीकर, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद - 431002 या पत्त्यावर दि. 12 सप्टेंबर, 2018 पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद  क्षेत्र, औरंगाबाद  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

जिल्हा माहिती कार्यालय आयोजित ‘लोकराज्य’ वाचक अभियानात ऐकावयास मिळणार अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकरांचे अनुभव शनिवारी जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात शुभारंभ


जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) - स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे अनुभव आणि मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर 2018 मध्ये लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या सरस्वती सभागृहात शनिवार, 1 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा लोकराज्य मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकात शासनाच्या योजनांची माहिती, विविध विषयांवर आधारित लेख, यशकथा, शासन निर्णय आदिंचा समावेश असतो. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी लोकराज्य मासिकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करतात. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने या वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय लोकराज्य वाचक अभियानात शाळा, महाविद्यालयांत ‘लोकराज्य’ वर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे.
लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्री. गाडीलकर हे लोकराज्य मासिकाची उपयुक्त्तता, स्पर्धा परीक्षेच्या तयारीत लोकराज्य चे महत्व, त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन, मुलाखत  याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे हे भूषविणार आहे.
 सध्या लोकराज्य हे राज्यातील पहिल्या व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खपाचे मासिक आहे. वाचक, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व मुलाखतींना सामोरे जाणारे उमेदवार यांच्यासाठी खूप उपयुक्त मासिक आहे. तरी या मेळाव्यास वाचक, स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, मुलाखतीस सामोरे जाणारे विद्यार्थी यांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके केले आहे.
000

Thursday, 30 August 2018

18 सप्टेंबरला मुंबईत पेंशन अदालतीचे आयोजन


           जळगाव, दि.30- केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्त्तीवेतनधारक कल्याण विभागाचे दि. 18 जुलै 2018 रोजीचे कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र शासनाने दि 1 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांचे सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन सुधारणेसंदर्भात संपूर्ण देशामधील संबंधित राज्य / केंद्र शासित प्रदेशामध्ये पेंशन अदालत आयोजित करण्याचे सुचित केलेले आहे.
            त्यानुसार दि. 1 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांना याव्दारे कळविण्यात येते की, आपले सेवानिवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यासंदर्भात आपल्या काही तक्रारी असल्यास, त्या कृपया आपल्या सबंधित विभागास म्हणजेच  भारतीय प्रशासन सेवा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई, भारतीय पोलिस सेवा-गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, भारतीय वन सेवा – महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई , यांच्याकडे दि 31 ऑगस्ट 2018 पुर्वी लेखी स्वरुपात ई – मेल / फॅक्स अथवा पोस्टाव्दारे सादर करावे, तसेच पेंशन अदालत मध्ये आपण अथवा आपला प्रतिनिधी यांनी आपल्या तक्रारीसह उपस्थित रहावे, पेशंन अदालतची दिनांक स्थळ व वेळ खालीलप्रमाणे दिनांक 18 सप्टेंबर 2018  वेळ सकाळी 11 ते 2 वा. स्थळ – परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय (विस्तार इमारत ) मुंबई – 400032 असे सीताराम कुंटे, भाप्रसे अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००