Thursday, 11 September 2025

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांकरीता ऑनलाईन नोंदणी साठी मुदतवाढ

         जळगाव, दि. 11 (जिमाका) - राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२ वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमान प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशीत असलेल्या व या योजनाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना योजनांकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  १८ सप्टेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

            या योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या सकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावे, असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण योगेश पाटील यानी केले आहे.

000000000

 

Wednesday, 10 September 2025

जागतिक कौशल्या स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी .

         जळगाव दि. १० (जिमाका) – जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

            या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध औद्योगिक आस्थापना आणि सेक्टर स्किल काउन्सिल यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले उमेदवार विभागस्तर, त्यानंतर राज्यस्तर, देशपातळी आणि अखेरीस जागतिक नामांकनाकरिता शिफारस केले जाणार आहेत.

स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा मुख्य निकष ठरविण्यात आला आहे.

            या  स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या स्पर्धेसाठी सर्व  प्रशिक्षण केंद्रांनी आपल्या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून यांचा सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव चे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

            अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे  कळविण्यात आले आहे.

00000000000

झोमॅटो, अमेझोन व इतर प्लॅटफॉर्म डिलीव्हरी बॉय वर्कर्स यांना नांव नोंदविण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 10 (जिमाका) - केंद्र शासनाने नुकताच गिग वर्कर्स कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात जे कोणत्याही कंपनीचे कायम कर्मचारी नसून, ते स्वतंत्रपणे काम करतात, जे पारंपारिक नियोक्ता - कर्मचारी या संबंधाबाहेर काम करतात. तसेच ते अल्पकालीन वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. जसे की, पार्सल डिलीव्हरी करणे, रिक्षा -कॅब चालविणे, झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, झेप्टो, अर्बन कंपनी आणि इतर ऑनलाईन कामे करणाऱ्या तसेच सेल्यमन, हेल्पर, ऑटो चालक, ड्रायवार, पेपर विक्रेते, ऑनलाईन मार्केटिंग, ग्राफिक डिझाईनिंग इत्यादि सर्व असंघटित कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यास अनुसरुन ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम वर नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचे जास्तीत जास्त लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे. तरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन ओळखपत्र मिळविण्याची संधी या वर्षी पुन्हा तिसऱ्या वेळेस दिलेली आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर दुर्दैवाने अपघातासह अन्य कारणास्तव दिव्यांगत्व आल्यानंतर सदर असंघटित कामगारांना कामगार विभागाच्यावतीने १ लाख मदत मिळण्यास मदत होणार आहे.

अशी करा नोंदणी :-

            eshram.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर ऑन ई-श्रमवर क्लिक करा, आधारकार्डाशी लिंक असलेला मोबाईलवर नंबर आणि कॅप्या कोड टाका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांच्या माध्यामातून नोंदणी करा. ओटीपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा अर्ज भरा आणि सबमिट करा. जर असंघटित कामगार ऑनलाईन नोंदणी करु शकत नसेल तर त्यांनी जवळच्या महाई-सेवा केंद्रावरुन अर्ज भरु शकतात.

काय फायदा मिळणार ?

            ई-श्रम कार्ड असलेल्या असंघटित कामगारांना ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन, २ लाखांचा मृत्यू विमा आणि १ लाखांची आंशिक अपंगत्वापोटी आधिक मदत मिळणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध असुन वयाच्या साठीनंतर पेन्शनही मिळणार, हेल्पलाईन नंबर  ई-श्रम कार्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर (सोमवार ते रविवार)- १४४३४ ई-श्रम ईमेल आयडी eshramcare-mole@gov.in  या प्रमाणे आहे. असे सहाय्यक कामगार आयुक्त  डॉ. रा.दे. गुल्हाने  यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे. 

000000000000


 

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 जळगाव, दि. 10 (जिमाका) - वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व बाबी टाळण्यासाठी व आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 13 सप्टेंबर, 2025 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात 13 सप्टेंबर, 2025 रोजी  एकाच वेळी एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदातीचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात करण्यात आले असून लोकअदालत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.क्यु.एस. एम. शेख हे राहणार आहेत. लोकअदालतीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त आदि मान्यवरांचे सहाकार्य लाभणार आहे.

            राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटले दाखलपुर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यात येतील. त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकीत रकमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहेत. आद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचाकडील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.

            तरी ज्या पक्षकारांना वेळ, पैसा यांचा अपव्यय टाळायचा आहे अशा सर्व पक्षकारांनी आपली प्रकरणे सामोपचार व तडजोडीने निकाली काढण्यासाठी पक्षकार व विधीज्ञ यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नागरिक हितार्थ आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकान्वये केले आहे. 

०००००००००००००

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ३० सप्टेंबर पर्यंत शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

               जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्याथ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारतसरकार मंट्रोकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परिक्षा फी (फ्रीशीप) व इतर योजना राबवण्यात येतात. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी प्रक्रीया सुरु झालेली आहे तरी या प्रवर्गातील अधिक विद्याथ्यांनी अर्जाची नोंदणी करावी  तसेच सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलबित असलेल्या अर्जाची त्रुटीपूर्तता करून पात्र अर्ज दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मंजूरी करिता सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव कार्यालयास ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

            केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (अनुसुचित जाती प्रवर्ग) योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा केंद्र हिस्सा ६० टक्के केंद्र शासनाकडून पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यावर जमा करण्यात येतो. राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचा ४० टक्के हिस्सा महाडीबीटी प्रणालीद्वारे संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रदान करण्यात येतो.

            अनुसूचित जाती प्रवगांतील विद्याथ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या केंद्र हिश्शाची अदायगी करण्यात आलेल्या बाबतचा तपशिल महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध नसून दुसन्या हप्त्याची अदायगीचों सद्यस्थिती स्वतंत्ररित्या अर्जनिहाय केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीवरून https://pfms.nic.in/Home.aspx लिंकद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना उपलब्ध करून घेता येणार आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र हिस्सा ६० टक्के थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये वितरीत होत आहे. तथापि केंद्र शासनाची अदायगी प्रलंवित असल्याबाबत विद्यार्थी, पालक, महाविद्यालय व स्थानिक संघटना यांचेकडून मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार/निवेदन तक्रारी प्राप्त होत आहेत. सदर बाब ही केंद्र शासनाशी निगडीत असल्याने, तक्रारदारांनी त्यांची तक्रार थेट पीजी पोर्टलवर (Centralised Public Grievance)(https://pgportal.gov.in/Home/Lodge Grievance) नोंदणी करावे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे बैंक खाते थेट आधारः संलग्नीकृत करण्याकरिता अथवा विद्यार्थ्यांच्या आधार संबंधित अडचणीचे निराकरण करण्याकरिता https://base.npcl.org.in/catalog/homescreen या प्रणालीचा वापर करावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

०००००००००००

Tuesday, 9 September 2025

सेवा निवृत्त मयत व्यक्तीच्या वारसांना भुसावळ तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

             जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):-  तहसिल कार्यालय, भुसावळ येथे कार्यरत असलेले व नियत वयोमाना नुसार  28 फेब्रुवारी, 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्व्यर राजधर पाटील, सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय भुसावळ व्दारा - दिनेश मधुकर भामरे, केले नगर भाग 1, प्लॉट नं. 44 एस आर पी कॉलनी, देवपूर धुळे यांचे  26 जुलै, 2025 रोजी निधन झाले आहे.या बाबत समाज माध्यमांव्दारे या कार्यालयास माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या कायदेशीर वारसांना सदरची नोटीस प्रसिध्द  झालेपासून एक महिन्याच्या आत पुढे नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, भुसावळ येथे कार्यालयीन दिवशी व वेळी उपस्थित राहावे.

            कार्यालयात येतांना,सोबत अर्जदाराचा (कायदेशिर वारस ) पासपोर्ट आकाराचा फोटो, मयत कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा दाखल्याची मूळ व छायांकित प्रत, अर्जदाराचा (कायदेशीर वारस) ओळखपत्र आणि पत्याचा पुरावा, वारस प्रमाणपत्र किंवा कुटूंबातील सदस्यांची यादी ( कुटुंब प्रमाणपत्र) व वारसांचे संमतीपत्र, मयत कर्मचाऱ्याचे सेवा मूळ सेवा पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ( ज्यात खाते क्रमांक आणि IFSC  कोड स्पष्ट दिसेल),अशी कागद पत्र आणावीत, असे भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००००००

फत्तेपूर पोस्ट ऑफिससाठी इमारत भाडेतत्वावर पाहिजे

             जळगाव, दि. 09 (जिमाका) – भारतीय डाक विभागामार्फत फत्तेपूर (पिन–४२४२०८) पोस्ट ऑफिससाठी सुमारे ५०० चौ.फुटांची इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही इमारत RCC बांधकामाची असावी तसेच त्यात वीज, पाणी, स्वतंत्र शौचालय, कर्मचाऱ्यांच्या दोनचाकी-चारचाकी वाहनांसह अभ्यागतांसाठीही पार्किंगची सोय असणे बंधनकारक आहे.

            इमारत फत्तेपूर गावाच्या हद्दीत, शक्यतो मध्यवर्ती भागात असावी. विजेच्या बिलाव्यतिरिक्त ग्रामपंचायत कर व पाणी कर भरण्याची जबाबदारी मालकाची असेल.

            इच्छुक मालक, संस्था किंवा कंपन्यांनी जागेचा कच्चा व मंजूर आराखडा, बांधकाम परवाना, बांधकामाचा प्रकार व वर्ष, मालकी/नोंदणी पुरावा, कर पावती व अपेक्षित भाड्याचा तपशील प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव सीलबंद लिफाफ्यातून अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ–४२५२०१ या पत्त्यावर पाठवावेत.

            प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत असून प्राप्त प्रस्तावांचे मुल्यांकन इमारतीची योग्यता व अपेक्षित भाडे यावर आधारित केले जाईल. प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधित मालकाला किमान ५ वर्षांचा करार भारतीय डाक विभागाशी करावा लागेल. तसेच कोणताही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्याकडे राहील.

०००००००००००

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन

               जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण  हे 23 सप्टेंबर, 2025 ते 9 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सचिन धस, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे.

             नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही त्यांना विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची अनुमती देण्यात येणार आहे. असेही सचिन धस, सहसचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००००००

Monday, 1 September 2025

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

         जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड व NCCF च्या वतीने ही खरेदी प्रक्रिया राज्यातील पणन महासंघामार्फत पार पाडली जाणार असून, यात मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश आहे.

            आधारभूत दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीसह ७/१२ उतारा आवश्यक राहणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया ही पारदर्शक, कार्यक्षम आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याचे मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक नामदार संजय सावकारे ,  उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी सांगितले आहे .

            केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत आपल्या पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे

.०००००००००००

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्ज प्राप्त

 



















       जळगाव, दि. १ सप्टेंबर, २०२५ (जिमाका वृत्तसेवा) –  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज  अल्पबचत भवन,  येथे अपर जिल्हाधिकारी विजय कुमार ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले.

            या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी  जयश्री माळी, तहसीलदार डॉ.उमा ढेकळे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी,

            लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना  या वेळी निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन अर्जांवर  कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

                                          000000000

परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू

             जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नविन नोंदणी एमएच-११/ईएस ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.

            ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी परिवहन कार्यालयात २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज जमा करावेत. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

             आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर  पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राह्यता ही फक्त १८० दिवस राहील अधिक माहितीसाठी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव. येथे संपर्क साधावा.

00000000000