जळगाव दि. १० (जिमाका) – जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या
पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण संचालनालय, विविध औद्योगिक आस्थापना आणि सेक्टर स्किल काउन्सिल यांच्या
सहकार्याने करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले उमेदवार
विभागस्तर, त्यानंतर राज्यस्तर, देशपातळी आणि अखेरीस जागतिक नामांकनाकरिता शिफारस
केले जाणार आहेत.
स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा मुख्य निकष ठरविण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी ३० सप्टेंबर
२०२५ पर्यंत https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी
करणे आवश्यक आहे.
या
स्पर्धेसाठी सर्व प्रशिक्षण केंद्रांनी
आपल्या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून यांचा सहभाग
नोंदवावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
जळगाव चे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.
अधिक
माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर किंवा शासकीय तांत्रिक
विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,
असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात
आले आहे.
00000000000
No comments:
Post a Comment