जळगाव, दि. 09 (जिमाका) – भारतीय डाक विभागामार्फत फत्तेपूर (पिन–४२४२०८) पोस्ट ऑफिससाठी सुमारे ५०० चौ.फुटांची इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही इमारत RCC बांधकामाची असावी तसेच त्यात वीज, पाणी, स्वतंत्र शौचालय, कर्मचाऱ्यांच्या दोनचाकी-चारचाकी वाहनांसह अभ्यागतांसाठीही पार्किंगची सोय असणे बंधनकारक आहे.
इमारत
फत्तेपूर गावाच्या हद्दीत, शक्यतो मध्यवर्ती भागात असावी. विजेच्या बिलाव्यतिरिक्त
ग्रामपंचायत कर व पाणी कर भरण्याची जबाबदारी मालकाची असेल.
इच्छुक
मालक, संस्था किंवा कंपन्यांनी जागेचा कच्चा व मंजूर आराखडा, बांधकाम परवाना, बांधकामाचा
प्रकार व वर्ष, मालकी/नोंदणी पुरावा, कर पावती व अपेक्षित भाड्याचा तपशील प्रस्तावासोबत
जोडणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव सीलबंद लिफाफ्यातून अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ–४२५२०१ या पत्त्यावर पाठवावेत.
प्रस्ताव
स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत असून प्राप्त प्रस्तावांचे मुल्यांकन
इमारतीची योग्यता व अपेक्षित भाडे यावर आधारित केले जाईल. प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधित
मालकाला किमान ५ वर्षांचा करार भारतीय डाक विभागाशी
करावा लागेल. तसेच कोणताही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार अधीक्षक डाकघर,
भुसावळ विभाग यांच्याकडे राहील.
०००००००००००
No comments:
Post a Comment