Tuesday, 20 February 2018

महिला लोकशाही दिनी दोन तक्रार अर्ज प्राप्त

        जळगाव, दि. २० - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
      यावेळी महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना निवासी उप जिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी संबंधितांना दिल्यात. आजच्या लोकशाही दिनात पोलीस विभागाशी संबंधित दोन तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती रमेश काटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली. या लोकशाही दिनास विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                                 ०००

No comments:

Post a Comment