Friday, 9 February 2018

सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा

           जळगाव दि.9 - राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे रविवार दि. 11 फेब्रुवारी, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
           रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. 55 मि. नी. पुणे रेल्वे स्टेशन येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. 10 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी 11 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून हॉटेल फोर सिझन रिक्रीएशनकडे प्रयाण. सकाळी 11 वा. 15 मि. नी. हॉटेल फोर सिझन रिक्रीएशन (हॉटेल मैत्रेयाज) एम. आय. डी. सी. जळगाव येथे आगमन व श्री. सुनिल झंवर यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वा. जळगाव येथून वाहनाने नाशिककडे प्रयाण.
                                                                           ०००

No comments:

Post a Comment