जळगाव, दि. 8 - जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील
खरगोण, बडवाणी व बऱ्हाणपूर (27- खरगोण व 28-खंडवा लोकसभा मतदार संघ) या जिल्ह्यात
रविवार, दिनांक 19 मे, 2019 रोजी मतदान होणार आहे.
या
निवडणूकीसाठी मतदारांना मतदान करता यावे, म्हणून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे
कलम 135 बी मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारीडॉ. अविनाश
ढाकणे, यांनी जळगाव जिल्ह्यात सध्या
वास्तव्यास असलेले तथापि, खरगोण, बडवाणी व बऱ्हाणपूर (27-खरगोण व 28-खंडवा लोकसभा
मतदार संघ ) या जिल्ह्यातील मतदार असलेल्या मतदारांना 19 मे, 2019 रोजी पगारी
सुट्टी ( Paid holiday) घोषित केलीआहे.
No comments:
Post a Comment