Friday, 3 May 2019

गोपनीय अहवालांचे प्रतिवेदन आणि पुनर्विलोकनासाठी शिबीराचे आयोजन



        जळगाव, दि. 3 - जिल्ह्यातील एकाही अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल अपूर्ण राहणार नाहीत यासाठी जिल्हास्तरासह तालुकास्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
            प्रतिवेदन कॅम्प शनिवार, दिनांक 11 मे, 2019 रोजी तर पुनर्विलोकन कॅम्प शनिवार, दिनांक 25 मे, 2019 सकाळी 11 वाजता आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
          जे अधिकारी प्रतिवेदन / पुनर्विलोकनाचे काम कॅम्प पूर्वीच पुर्ण करतील त्यांना उपरोक्त दोनही कॅम्प मध्ये सहभागी होण्याची आवश्यकता नाही. 
            प्रतिवेदन व पुनर्विलोकनाचे काम संपल्यानंतर नमुना 1 ते 8 मध्ये अहवाल त्याच दिवशी अथवा ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत. त्यानुसार आपल्या कार्यालयातील प्रतिवेदन अधिकारी, पुनर्विलोकन अधिकारी यांना जिल्हास्तरीय कामी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे तसेच तालुकास्तरीय शिबीरासाठी संबंधित तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणेबाबत सूचना देवून शिबीराच्या दिवशी विहीत नमुन्यातील प्रपत्राप्रमाणे माहिती सादर करावी. असेही जिल्हाधिकारी श्री. डॉ.अविनाश ढाकणे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment