Friday, 13 September 2019

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा तालुकानिहाय मासिक दौरा कार्यक्रम जाहीर



            जळगाव.दि.13:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी 08 सहा. मोटार वाहन निरिक्षक यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आलेली असल्यामुळे कार्यकारी अधिकारी संवर्गातील मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे सदरचा बदल करण्यात येवून दि. 16 सप्टेंबर, 2019 पासून जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, एरंडोल हे तालुके वगळून जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा तालुकानिहाय मासिक दौऱ्यांचा कार्यक्रम जाहीर केला असून तालुका निहाय दौऱ्यांचा वार (दिवस) पुढीलप्रमाणे..
            अमळनेर - पहिला सोमवार आणि चौथा मंगळवार, जामनेर- दुसरा गुरूवार, पाचोरा -पहिला बुधवार, भुसावळ-- पहिला गुरुवार व चौथा गुरुवार, धरणगाव --चौथा शुक्रवार, चाळीसगाव--दुसरा व चौथा सोमवार, यावल -पहिला शुक्रवार, चोपडा-- दुसरा शुक्रवार, रावेर -दुसरा मंगळवार, भडगाव -चौथा बुधवार, पारोळा- दुसरा बुधवार ,मुक्ताईनगर- पहिला मंगळवार असा असून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी  असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल अन्यथा रद्द समजण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळ‍विले आहे.
00000

No comments:

Post a Comment