Tuesday, 1 September 2020

डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ

        जळगांव, (जिमाका) दि. 1 - डी.एल.एड प्रवेश सन 2020-21 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीचे वेळापत्रक संचालक, विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून प्राप्त झाले आहे. ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरल्यानंतर कोविड प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे ऑनलाईन पध्दतीन पडताळणी होणार असून पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यालयात गर्दी करु नये, तसे आपणास एस.एम.एस व्दारे कळविण्यात येईल. असे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक सन 2020-21 (शासकीय कोटा)

            उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरणे- 17 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर, 2020,

DIET स्तरावर पूर्ण भरलेल्या आवेदनपत्राची ऑनलाईन पडताळणी करणे- 17 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर, 2020, Objectioncummeritlist प्रसिध्द करणे-10 सप्टेंबर 2020,

पूर्ण भरलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे- 13 सप्टेंबर, 2020,

प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहिर करणे- 4 सप्टेंबर, 2020,

प्रथम फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेणे- 14 ते 17 सप्टेंबर, 2020, 

प्रथम फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची यादी DIET कडे Login  वर पाठविणे-17 सप्टेंबर, 2020,

दुस-या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवारास बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील -18 सप्टेंबर, 2020,

दुसरी प्रवेश फेरी यादी जाहिर करणे- 20 सप्टेंबर, 2020,

दुस-या प्रवेश फेरीतील उमेदवारानी प्रवेश घेणे- 21 ते 24 सप्टेंबर, 2020 

दुस-या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी DIET कडे Login वर पाठविणे- 24 सप्टेंबर, 2020,

तिस-या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवारास बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील - 25 सप्टेंबर, 2020,

तिसरी व अंतिम प्रवेश फेरी यादी जाहिर करणे- 27 सप्टेंबर, 2020,

तिस-या प्रवेश फेरीतील उमेदवारानी प्रवेश घेणे- 28 सप्टेंबर, 2020 ते 1 ऑक्टोंबर, 2020,

तिस-या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी DIET कडे Login वर पाठविणे- 1 ऑक्टोंबर, 2020, DIET प्राचार्यांनी जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करणे - 3 ऑक्टोंबर, 2020,

प्रथम वर्ष सुरु होण्याचा दिनांक - 25 सप्टेंबर, 2020

            प्रत्येक प्रवेश फेरीतील यादी जाहीर झाल्यापासून उपरोक्त ठरवून दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. उपरोक्त वेळापत्रक संभाव्य असून यामध्ये बदल करण्याचा अधिकार अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती, पुणे यांना राहातील. असे एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. 

00000

No comments:

Post a Comment