Wednesday, 2 October 2024

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा 3 ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा

                   जळगाव दि. 2 ( जिमाका ) - राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा 3 ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे. दुपारी १.३० वाजता नाशिक विमानतळ, ओझर येथे आगमन व विमानाने जळगांव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी २ वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता "महाराष्ट्राची उद्योग भरारी" या कार्यक्रमासाठी उपस्थित.

       सायंकाळी ४ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे पत्रकार परिषद, सायंकाळी ४.३० वाजता मैत्रेयाज हॉटेल, जळगांव येथे  विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा, सायंकाळी ६ वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण,सायंकाळी ६.३० वा. जळगांव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई कडे प्रयाण.

00000000000

No comments:

Post a Comment