Friday, 18 July 2025

केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. १८ जुलै (जिमाका) – केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

                यामध्ये  इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना,  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यांसारख्या केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र (DLC) तयार करून संबंधित पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

                 यासाठी केंद्र शासनाने 'बेनिफिशियरी सत्यापन अ‍ॅप (Beneficiary Satyapan App)' विकसित केले असून ते Google Play Store वर अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलसाठी उपलब्ध आहे. हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी:

1. 'आधार फेसआरडी' (Aadhaar FaceRD) अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करा.

2. 'बेनिफिशियरी सत्यापन' (Beneficiary Satyapan) अ‍ॅप डाउनलोड करून डिव्हाइस नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

3. लाभार्थ्याने आधार क्रमांक, मोबाईल नंबर व OTP च्या माध्यमातून चेहरा, बोटांचे ठसे किंवा डोळ्यांची पडताळणी करून हयात प्रमाणपत्र तयार करावे.

4. प्रमाणपत्र यशस्वीरित्या तयार झाल्यावर NSPT पोर्टलवर आपोआप अपलोड होईल व SMS द्वारे पुष्टी मिळेल.

 लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000000000

No comments:

Post a Comment