Friday, 18 July 2025

माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांसाठी 'विशेष गौरव पुरस्कारासाठी' अर्ज करण्याचे आवाहन

            जळगाव, दि. १८ जुलै (जिमाका )- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, त्यांची पत्नी तसेच पाल्य यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे मार्फत दिला जाणारा विशेष गौरव पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध क्षेत्रांत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांचा गौरव करण्याचा हेतू या पुरस्कारामागे आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी खालील पात्रतेच्या आधारे अर्ज मागविण्यात येत आहेत:

            देश, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा वाढवणारे उल्लेखनीय कार्य करणारे माजी सैनिक/पत्नी/. पाल्य , इ. १० वी मध्ये ९०% व त्यापेक्षा अधिक गुण व १२ वी मध्ये ८५% व त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले पाल्य.

सदर पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी आपले अर्ज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत, असे आवाहन मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.

                                                                              000000000000 

No comments:

Post a Comment