जळगाव, दि. १ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)— महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासन मान्यताप्राप्त वसतीगृहांमध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती (व्हीजेएनटी), भटक्या जाती (एसबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) व आर्थिक दुर्बल घटकांतील (EWS) विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत
एम.आय.डी.सी. जळगाव येथील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष
मागास प्रवर्गातील मुलांसाठीचे वसतीगृह आणि मेहरुण रोड, जळगाव येथील मुलींसाठीचे
वसतीगृह यामध्ये अनुक्रमे 9 आणि 11 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी शासनमान्य तांत्रिक, औद्योगिक, उच्च व व्यावसायिक शिक्षण
अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. अशा विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये
निवास, भोजन, वाचनालय, अभ्यास व्यवस्था, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम अशा विविध
सोयी पुरविल्या जातात.
या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर
https://hmas.mahait.org वर दिनांक २९ ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण
करणे आवश्यक आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक दाखले, जात
प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड इत्यादी आवश्यक
कागदपत्रे अपलोड करावीत.
वसतीगृह प्रवेश प्रक्रियेसाठी
पुढीलप्रमाणे आरक्षण ठेवण्यात आले आहे: इतर मागास प्रवर्गासाठी 51 टक्के,
विजाभजसाठी 33 टक्के, विमाप्रसाठी 6 टक्के, दिव्यांसाठी 4 टक्के, अनाथ २ टक्के आणि
आर्थिक मागास प्रवर्ग घटक (EWS) साठी 4 टक्के इतके आरक्षण ठेवण्यात आले आहे.
व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता यथावकाश
प्रवेशाचे वेळापत्रक सादर करण्यात येईल.अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास
बहुजन कल्याण जळगाव कार्यालय, सामाजिक न्याय भुवन मायादेवी मंदिरासमोर महाबळ,
जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन वाय.
पी. पाटील, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण जळगाव यांनी केले आहे.
००००००००००
No comments:
Post a Comment