जळगाव, दि. ३ ऑगस्ट २०२५ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड रविवार, ३ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे.
सकाळी ११.०० वाजता चाळीसगाव येथील हेलिपॅडवर आगमन
होणार असून त्यानंतर ते मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी ११.१०
वाजता विश्रामगृहात पोहोचून ते काही वेळ राखीव असतील व यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत
चर्चा.
सकाळी ११.५० वाजता डॉ. तुषार राठोड यांच्या श्रीसेवा
डॉ. स्टार पॅथॉलॉजी लॅब (छत्रपती शिवाजी महाराज चौक, चाळीसगाव) येथे भेट देतील.
दुपारी १२.०० वाजता विराम लॉन्स, धुळे रोड बायपास
येथे आयोजित सकल बंजारा समाजाच्या संवाद मेळाव्यात मंत्री श्री. राठोड उपस्थित राहून
समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत.
दुपारी
३.०० वाजता ते तीज महोत्सवात सहभागी होणार असून हा कार्यक्रम श्री. सुधाकर राठोड यांच्या
निवासस्थानी "आलोक", हनुमानवाडी, स्टेशन रोड, चाळीसगाव येथे होणार आहे.
दुपारी ३.१५ वाजता मंत्री श्री. राठोड हे श्री.
संतोष भाऊ शर्मा यांच्या गांधी चौकातील निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.
दुपारी ३.३० वाजता चाळीसगाव येथील हेलिपॅडवरून
यवतमाळकडे प्रयाण करतील.
0000000000
No comments:
Post a Comment